Diwali Gift : कोण म्हणतंय मंदी येणार? ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून कार आणि बाईक

| Updated on: Oct 17, 2022 | 7:11 PM

ज्वेलरी दुकान मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ माझ्यासाठी दिला आहे म्हणून कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून कार आणि दुचाक्या वाटल्या आहेत.

Diwali Gift : कोण म्हणतंय मंदी येणार? या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून कार आणि बाईक
Follow us on

नवी दिल्लीः सध्या सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. बाजारपेठाही वेगवेगळ्या वस्तूंनी सजल्या आहे. त्यामुळे दिवाळीच्या या खास प्रसंगी अनेक कंपन्याकडून आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाई व्यतिरिक्त काही भेटवस्तूही (diwali special gift) देण्यात येतात. यामधील काही कंपन्या अशा आहेत की, दिवाळीचा सण कायम स्वरुपी अविस्मरणीय बनवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना अशा काही वस्तू भेटवस्तूही दिल्या जात आहेत की,. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. भेटवस्तूंमुळे कंपनी आणि त्यांचे कंपनीचे मालकही प्रसिद्ध झोतात येत आहेत. असाच एक वेगळा उपराक्रम चेन्नईतील एका ज्वेलरी व्यापाऱ्याने (jewellery shop) केला आहे.

त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्या आहेत. त्यामुळे या सोन्याच्या दुकानाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

 

ज्यांनी आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत त्या ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल सांगतात की, त्यांनी त्यांच्या 10 कर्मचाऱ्यांना कार आणि 20 कर्मचाऱ्यांना 20 दुचाकी दिल्या आहेत.

ते म्हणतात की, या लोकांनी मला त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा वेळ दिला आहे. व्यापाऱ्यातील प्रत्येक चढ-उतारात ते माझ्यासोबत काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी या भेटवस्तू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारची ही घटना काही पहिलीच नाही, याआधीही सुरतचे अब्जाधीश हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, कार आणि इतर मौल्यवान भेटवस्तू दिल्या होत्या त्यावेळी त्या घटनेची जोरदार चर्चा झाली होती.

2016 मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1,260 कार दिल्या होत्या. त्यावेळीही या बातमीमुळे देशभरातील लक्ष वेधले होते.

त्यानंतर, यंदा पुन्हा एकदा चेन्नईच्या या व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि दुचाकी दिल्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

त्यामुळे ही बातमी ज्यावेळी सोशल मीडियावरुन व्हायरल झाली तेव्हापासून प्रत्येक म्हणत आहे की, तुम्ही जर बॉस असाल तर असच काम करा.