होडीत साप दिसला म्हणून 17 जणांनीही पाण्यात मारली उडी; 7 जण बुडालेच; आणखी काही जणांचा शोध सुरूच…

| Updated on: Sep 02, 2022 | 2:42 PM

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथे एका बोट बुडाल्याची दुर्घटना समोर आली आहे. बोट ज्यावेळी नदीच्या मध्यभागी होती, त्याचवेळी बोटीमध्ये साप आल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर होडीतच लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन सापाला घाबरून नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या.

होडीत साप दिसला म्हणून 17 जणांनीही पाण्यात मारली उडी; 7 जण बुडालेच; आणखी काही जणांचा शोध सुरूच...
Follow us on

गाजीपूरः उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गाजीपुरमध्ये (Gajipur) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका होडीतून 17 जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या होडीमध्ये साप घुसल्याचे समजताच लोकांनी होडीतच गोंधळ घातला. होडीत आलेल्या सापाला घाबरून आणि सापापासून जीव वाचवण्यासाठी 17 जणांनीही पाण्यात उडी (17 people drowned) मारली. मात्र त्यापैकी 7 जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे  माहिती जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली तर त्यानंतर एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची तब्बेत बरी झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले मात्र आणखी काही जणांचा शोध घेण्याचा काम अजूनही सुरू असल्याचे एनडीआरएफच्या जवानांकडून सांगण्यात आले. नागरिकांचा शोध घेण्याचे काम अजूनही चालूच ठेवण्यात आले आहे.

बोटीतून पाण्यात उडी मारुन 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून जखमी असलेल्या नागरिकांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

आणि बोटीत साप घुसला

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथे एका बोट बुडाल्याची दुर्घटना समोर आली आहे. बोट ज्यावेळी नदीच्या मध्यभागी होती, त्याचवेळी बोटीमध्ये साप आल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर होडीतच लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन सापाला घाबरून नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या.

17  पैकी 7 जणांचा मृत्यू

यावेळी 17 जण होडीतच प्रवास करत होते, त्या सर्वांनी पाण्यात उडी मारली मात्र त्या 17 पैकी 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजून एनडीआरएफच्या जवानांचे शोधकार्य सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे.

एक जण बचावला

गाझीपूरच्या शिवराई तालुक्यातील अठ्ठा गावात कालच बोट बुडाल्याची दुर्घटना घडली होती, त्या दुर्घटनेत 17 जण बुडाल्याची माहिती मिळाली होती, त्यातील 3 जणांना सायंकाळी उशिरा बाहेर काढण्यात आले होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एका व्यक्तीवर उपचार करुन त्या व्यक्तीला घरी पाठवण्यात आले आहे.

राज्य सरकारची आर्थिक मदत

तर बेपत्ता झालेल्या 5 जणांचे मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.