हिवाळ्यानंतर डायरेक्ट पावसाळा आला काय ? शिमल्यात 17 वर्षांनंतर एप्रिलमध्ये सर्वाधिक मुसळधार पाऊस, नागरिकांची उडवली भंबेरी

| Updated on: May 01, 2023 | 9:47 AM

ऐन उन्हाळ्यात शिमल्यात अगदी पावसाळ्यासारखी पर्जन्यवृष्टी झाला असून गेल्या 20 वर्षांतील (एप्रिलमधील) हा सर्वाधिक पाऊस आहे.

हिवाळ्यानंतर डायरेक्ट पावसाळा आला काय ? शिमल्यात 17 वर्षांनंतर एप्रिलमध्ये सर्वाधिक मुसळधार पाऊस, नागरिकांची उडवली भंबेरी
Image Credit source: ANI
Follow us on

शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) गेल्या 20 वर्षांत दुसऱ्यांदा एप्रिलमध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) झाला. 17 वर्षांनंतर, शिमल्यात (Shimla) 24 तासांत सर्वाधिक पाऊस झाला, तर 10 वर्षांत एप्रिलमध्ये कमाल पारा सर्वात कमी नोंदवला गेला. यावर्षी 1 ते 30 एप्रिलपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा 63 टक्के जास्त पाऊस झाला आहे. यापूर्वी 2021 मध्ये 70 टक्के तर 2019 मध्ये 50 टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती.

शिमल्यात शनिवारी रात्री आणि रविवारी 54 मिमी पाऊस झाला. यापूर्वी 2006 मध्ये 56 मिमी पाऊस पडला होता. रविवारी शिमल्यामध्ये हलक्या पावसासह जोरदार गारपीट झाली. दुपारी काही काळ शहरात अंधार पसरला होता. सिमला येथे 2007 ते 2022 या 24 तासांत दुसरा सर्वाधिक पाऊस 2017 मध्ये, 52 मिमी होता. तर एप्रिल महिन्यातील बहुतांश दिवस यंदा थंडीतच गेले. राजधानी शिमलामध्ये यावर्षी 17 एप्रिलला कमाल तापमान 25.9अंश नोंदवले गेले. पूर्वी ते 28 अंशांच्या वर जायचे. यावर्षी एप्रिलमध्ये नोंदवण्यात आलेला हा उच्चांक होता.

इतर दिवशी कमाल तापमान सरासरी 20 अंशांच्या खाली राहिले. यावर्षी एप्रिलमध्ये 25.9 अंश सेल्सिअस इतके विक्रमी तापमान गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमान होते. याआधी 2013 मध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक 23.9 अंश तापमानाची नोंद झाली होती.

2014 ते 2022 पर्यंत कमाल पारा 26 अंशांच्या वर राहिला. यावेळी उना, बिलासपूर, हमीरपूर आणि कांगडा या मैदानी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशांपर्यंतही पोहोचले नाही. गतवर्षी उनामध्ये कमाल तापमान 43 अंशांवर पोहोचले होते.

राजधानी शिमल्यासह उंचावर असलेल्या बहुतेक भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेट आणि स्वेटर घालावे लागत आहेत. थंडीमुळे सर्दी, तापाचे डझनभर रूग्ण उपचारासाठी दररोज रूग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा ८९ टक्के कमी पाऊस झाला होता. गेल्या 19 वर्षांतील हा सर्वात कमी पाऊस होता.

एप्रिलमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडला – हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षी एप्रिलमध्ये सामान्यपेक्षा 63 टक्के जास्त पाऊस झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. या कालावधीत 64 मिमी पाऊस हा सामान्य मानला गेला. यावर्षी एप्रिलमध्ये 104.1 मिमी पाऊस झाला.

विलासपूर जिल्ह्यात 201 टक्के सामान्यपेक्षा जास्त, चंबामध्ये 36, हमीरपूरमध्ये 114, कांगडामध्ये 90, किन्नौरमध्ये 39, कुल्लूमध्ये 112, लाहौल-स्पीतीमध्ये दोन, मंडीमध्ये 141, शिमल्यात 161, सिरमौरमध्ये 116, सोलनमध्ये 187 टक्के उनामध्ये २६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

कोणत्या वर्षी किती मिलीमीटर पाऊस पडला ते जाणून घेऊया

वर्ष         पाऊस (मिलीमीटरमध्ये)

2004 –    25
2005 –    78
2006 –    61
2007 –    86
2008 –    27
2009 –    22
2010-     23
2011 –    01
2012-    23
2013 –   58
2014-    01
2015 –   34
2016-   20
2017-   35
2018 –  11
2019 –  50
2020 –  12
2021 –  70
2022 –  89
2023 –  63