Year Ender 2021: भारतासाठीचा ‘काळ महिना’; सर्वाधिक कोविड मृत्यू, ऑक्सिजनसाठी दाहीदिशा

| Updated on: Dec 23, 2021 | 12:10 AM

कोविड प्रकोपात वर्ष 2021 मध्ये अनेक भारतीयांनी आपल्या आप्तजणांना गमावलं. तर कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या 100 कोटींचा टप्पाही भारतानं यावर्षीच गाठला. कोविड प्रकोपाला आटोक्यात आणण्यासाठी भारतीयांनी शर्थीचे प्रयत्न केले. जीवाची बाजी पणाला लावून कोविड संकटात आरोग्य यंत्रणा धावून गेली. मात्र, यंदाच्या वर्षात मे महिना ‘काळ’ महिना ठरला.

Year Ender 2021: भारतासाठीचा ‘काळ महिना’; सर्वाधिक कोविड मृत्यू, ऑक्सिजनसाठी दाहीदिशा
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : नवं वर्ष (New Year) उजाडण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. सरत्या वर्षाचा मागोवा घेऊन नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सुखावणाऱ्या घटनांसोबत भारताला धक्का देणाऱ्या काही गोष्टीही यावर्षीही देशाच्या स्मृतीपटलावर नोंदविल्या गेल्या. कोविड प्रकोपात (Corona OutBreak) वर्ष 2021 मध्ये अनेक भारतीयांनी आपल्या आप्तजणांना गमावलं. तर कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या (Corona Vaccine) 100 कोटींचा टप्पाही भारतानं यावर्षीच गाठला. कोविड प्रकोपाला आटोक्यात आणण्यासाठी भारतीयांनी शर्थीचे प्रयत्न केले. जीवाची बाजी पणाला लावून कोविड संकटात आरोग्य यंत्रणा धावून गेली. मात्र, यंदाच्या वर्षात मे महिना ‘काळ’ महिना ठरला. कोरोना रुग्णसंख्येने मे महिन्यात सर्वोच्च संख्येचा स्तर गाठला.

कोविडची सर्वोच्च आकडेवारी

कोविड संसर्ग आणि मृत्यूंनी मे महिन्यात उच्चांक गाठला होता. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदविली गेली. एका महिन्यात तब्बल 90.3 लाख कोविड केस नोंदविल्या गेल्या. मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांत संख्या कमी झाली होती. मात्र, संपूर्ण वर्षाच्या तुलनेत नोंदविली गेलेली सर्वोच्च रुग्णसंख्या होती.

लाखो मृत्यू, स्मशानभूमीत रांगा

भारतासाठी मे महिना काळ महिना ठरला. कोविडची बाधा झालेल्या तब्बल एक लाख वीस हजार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.विपरित परिस्थितीनं टोकं गाठलं होतं. स्मशानभूमी तसेच कब्रस्थानामध्ये अंत्यविधीसाठी रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी प्रशासनाने स्मशानभूमींना बंदिस्त केले होते.

जागतिक कोविड नकाशात भारत

भारतात मे 2021 मध्ये जगाच्या तुलनेत सर्वाधिक कोविड संक्रमित तसेच कोविड मृत्यू नोंदविले गेले. भारतातील कोविड विस्फोटाकडे भारताचं लक्ष वेधलं गेलं. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील भारतीयांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.

ऑक्सिजनसाठी अख्खा भारत वेटिंगवर

भारताला ऑक्सिजनचा सर्वाधिक तुटवडा जाणवला. भारतात सर्वाधिक ऑक्सिजनची मागणी नोंदविली गेली. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्रापासून राज्य सरकारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण सोडण्याची दुर्देवी वेळही येऊन ठेपली होती. भारतीयांच्या जीवन मरणाच्या लढाईत ऑक्सिजन एक्स्प्रेसही रुळांवरुन धावली. केंद्र सरकारने मध्यवर्ती नियोजनाची सुत्रे हाती घेत परस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

इतर बातम्या :

Pfizer Covid Pill : फायझरच्या Paxlovid टॅब्लेटच्या आपत्कालीन वापरला अमेरिका अन्न व औषध प्रशासन विभागाची मान्यता

Winter Session : ठाकरे सरकारचा विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय, आशिष शेलारांचा आरोप