Corona vaccination | भारताने कोरोना लसीकरण मोहिमेत रचला इतिहास, 200 कोटी डोसचा टप्पा अखेर पूर्ण!

| Updated on: Jul 17, 2022 | 3:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 200 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. आरोग्यमंत्र्यांच्या ट्विटला रिट्विट करत मोदींनी लिहिले की, भारताने पुन्हा इतिहास रचला. लसीच्या 200 कोटी डोसचा विशेष आकडा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारतातील लसीकरण मोहिमेचे प्रमाण आणि गती अतुलनीय बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा अभिमान आहे.

Corona vaccination | भारताने कोरोना लसीकरण मोहिमेत रचला इतिहास, 200 कोटी डोसचा टप्पा अखेर पूर्ण!
Follow us on

मुंबई : भारतामध्ये (India) गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिम जोरदार सुरू आहे. भारताने कोरोना लसीच्या 200 कोटी डोसचा टप्पा ओलांडत इतिहासच रचला. भारतामध्ये लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू झाल्यापासून दोन कोटी डोस प्रशासित केले. ज्यामध्ये पहिला आणि दुसरा डोस समाविष्ट आहे. देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे (Health workers) अभिनंदन केले. ते म्हणाले की, आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, भारताने आतापर्यंत प्रशासित केलेल्या कोविड19 लसीचे 2 अब्ज डोस पार केले आहेत. या यशाबद्दल मी आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन करतो.

इथे पाहा पंतप्रधान नरेंद्र यांनी केलेले ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 200 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. आरोग्यमंत्र्यांच्या ट्विटला रिट्विट करत मोदींनी लिहिले की, भारताने पुन्हा इतिहास रचला. लसीच्या 200 कोटी डोसचा विशेष आकडा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारतातील लसीकरण मोहिमेचे प्रमाण आणि गती अतुलनीय बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा अभिमान आहे. यामुळे कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ मिळाले आहे. भारताने पार केलेल्या आकड्यानंतर जगातून भारताचे काैतुक केले जात आहे.

इथे पाहा डॉ. पूनम खेत्रपाल यांनी केलेले ट्विट

कोविड 19 लसीचे 2 अब्जाहून अधिक डोस

जागतिक आरोग्य संघटनेतील दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनीही या कामगिरीबद्दल भारत सरकारचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोविड 19 लसीचे 2 अब्जाहून अधिक डोस उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताचे अभिनंदन. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाचा प्रभाव कमी करण्याच्या देशाच्या बांधिलकीचा आणि प्रयत्नांचा हा आणखी एक पुरावा आहे.