Railway POD Hotel: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरच्या पॉड हॉटेलचं उद्या उद्घाटन होण्याची शक्यता; काय आहे पॉड हॉटेल?

| Updated on: Nov 16, 2021 | 11:42 AM

पॉड्स प्रवाशांना पारंपारिक हॉटेलपेक्षा खूपच स्वस्त दरात मुक्काम करण्याची सुविधा देतं. मुंबई सेंट्रल येथे 48 पॉड्स असतील ज्यात 30 क्लासिक पॉड्स, सात फक्त महिलांसाठी, 10 खाजगी पॉड्स आणि एक अपंगांसाठी अनुकूल पॉड आहेत.

Railway POD Hotel: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरच्या पॉड हॉटेलचं उद्या उद्घाटन होण्याची शक्यता; काय आहे पॉड हॉटेल?
POD Hotel Representation Image
Follow us on

मुंबईः भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मार्फत तयार केले गेलेले मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील पहिल्या पॉड हॉटेलचे (Pod Hotel at Mumbai Central) उद्घाटन उद्या, 17 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (State Railway minister Raosaheb Danve) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वृत्तानुसार, पॉड हॉटेलसह चर्नी रोड आणि ग्रँट रोड रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रोड ओव्हर ब्रिजचं पण उद्घाटन होईल.

काय आहे पॉड हॉटेल?

जपानी स्टाईलच्या या पॉड हॉटेलमध्ये अनेक लहान कॅप्सूल किंवा पॉड्स असलेली एक इमारत आहे, जीथे प्रवाशांना रात्रभर मुक्काम करता येईल. स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर वेटिंग रूमसचा वापर यासाठी केला गेला आहे. सर्वात स्वस्त पॉडची किंमत, 12 तासांसाठी 999 रुपये असेल असं सांगण्यात येतय. पॉड्समध्ये इतर मूलभूत सुविधांव्यतिरिक्त वायफाय (wifi), एअर कंडिशनिंग (AC), की कार्ड ऍक्सेस (key card access), आणि सीसीटीव्ही (cctv surveillance) पण असणार आहे.

स्लीपिंग पॉड्स हे जपानमधील आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे एक लोकप्रिय वैशिष्ट्य आहे. पॉड्स प्रवाशांना पारंपारिक हॉटेलपेक्षा खूपच स्वस्त दरात मुक्काम करण्याची सुविधा देतं. मुंबई सेंट्रल येथे 48 पॉड्स असतील ज्यात 30 क्लासिक पॉड्स, सात फक्त महिलांसाठी, 10 खाजगी पॉड्स आणि एक अपंगांसाठी अनुकूल पॉड आहेत. यात 5 शॉवर युनिट असण्याचीही शक्यता आहे.

अलीकडेच मध्य रेल्वेने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले आहे. रेल्वे रूळावर हे रेस्टॉरंट तयार करण्यात आलं असून CSMT प्लॅटफॉर्म क्र. 18 च्या समोरील हेरिटेज गल्लीमध्ये आहे.

या सुविधा IRCTC च्या ‘नाविन्यपूर्ण कल्पना धोरण’ (Innovative Ideas in catering policy) अंतर्गत तयार केल्या जात आहेत.

इतर बातम्या –

समृद्धी’वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य

मराठवाड्याच्या मातीतलं कसदार सोनं, 26 नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या IPS सोमय मुंडेच्या यश अपयशाचा ‘कुटाणा’