काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

| Updated on: Dec 09, 2020 | 9:02 AM

आणखी काही दहशतवादी लपून बसल्यामुळे चकमक अजूनही सुरुच आहे. | Jammu and Kashmir

काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Follow us on

श्रीनगर: पुलवामाच्या टिकन परिसरात बुधवारी भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याठिकाणी आणखी काही दहशतवादी लपून बसल्यामुळे चकमक अजूनही सुरुच आहे. (Indian army and terrorists encounter in Jammu Kashmir)

गेल्याच महिन्यात जम्मू-काश्मीरच्या नगरोटा परिसरात भारतीय लष्कराने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला होता. या भागातून काही दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन जात होते. त्यावेळी भारतीय लष्कराने जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर त्यांचा ट्रक अडवला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला होता. या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

यंदाच्या वर्षात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही दुसरी मोठी चकमक होती. यापूर्वी जानेवारी महिन्यात महामार्गावर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

‘दहशतवाद्यांना मोबाईलद्वारे थेट पाकिस्तानमधून सूचना’

नगरोटा चकमकीवेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून सूचना देण्यात येत असल्याचे पुरावे समोर आले होते. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एक डिजिटल मोबाइल रेडियो (DMR) मिळाला. या मोबाईल रेडिओवर पाकिस्तानमधून ‘कहां पहुंचे. क्या माहौल है. कोई मुश्किल तो नहीं है. 2 बजे फिर बता देंगे…’ असे संदेश पाठवण्यात आले होते. त्यामुळे दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील हँडलर्सकडून सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट झाले होते.

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट?

भारतात 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

(Indian army and terrorists encounter in Jammu Kashmir)