असला मुलगा नकोच, वृद्ध बापाने सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती; सर्वात मोठा अधिकारही हिरावला

| Updated on: Mar 06, 2023 | 12:46 PM

आयुष्याच्या शेवटच्या काळात सून आणि मुलासोबत मी राहायला हवं होतं. पण त्यांनी मला चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच मी राज्यपालांना संपत्ती ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला.

असला मुलगा नकोच, वृद्ध बापाने सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती; सर्वात मोठा अधिकारही हिरावला
up man
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुजफ्फरनगर : अनेक मुलं त्यांच्या आईवडिलांचा म्हातारपणात सांभाळ करत नाहीत. त्यामुळे आई वडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळे येते. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्यावर एकाकी जीवन जगण्याची वेळ येते. अशा घटना अनेकदा घडत असतात. पण एका बुर्जुर्ग दाम्पत्याने त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे. या वृद्ध दाम्पत्याने आपली दीड कोटींची संपत्ती थेट सरकारला दान करून टाकली आहे. शिवाय मुलाकडून अंत्यसंस्काराचा अधिकारही हिसकावून घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ही घटना घडली आहे. एका 80 वर्षाच्या नाथू सिंह यांनी आपली सर्व संपत्ती राज्यपालांना दान दिली आहे. मुलगा आणि सूनेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नाथू सिंह हे शेतकरी आहेत. ते त्यांच्या मुलावर आणि सूनेवर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. माझी सून आणि मुलगा माझ्याशी चांगलं वागत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्यावर प्रचंड नाराज होतो. म्हणूनच मी राज्यपालांना मी माझी दीड कोटींची संपत्ती दान केली आहे. माझ्या पश्चात माझा मुलगा आणि सून माझ्या संपत्तीचे वारसदार होऊ नयेत असं मला वाटतं, असं नाथू सिंह यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शाळा किंवा रुग्णालय बांधा

नाथू सिंह हे मुजफ्फरनगरच्या बिरल गावचे रहिवासी आहेत. सध्या ते एका वृद्धाश्रमात राहतात. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. माझ्या संपत्तीचे कोणीही वारस नसावेत असं मला वाटतं. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे माझी संपत्ती सुपूर्द करण्यासाठी मी अर्ज केला होता. माझ्या मृत्यूनंतर माझ्या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय उभं करण्याची मी विनंती केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

एवढी संपत्ती सरकारला जाणार

आयुष्याच्या शेवटच्या काळात सून आणि मुलासोबत मी राहायला हवं होतं. पण त्यांनी मला चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच मी राज्यपालांना संपत्ती ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला. या संपत्तीचा योग्य वापर व्हावा हाच या मागचा हेतू आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. नाथू सिंह ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी संपत्ती दान करण्यासाठी एक अर्ज केला. आपल्या कुटुंबाला संपत्ती मिळू नये. तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अंत्यसंस्काराचा अधिकार मिळू नये.

त्यांना अंत्यसंस्कारात सामील करून घेऊ नये असं नाथू सिंह यांना वाटतं, असं वृद्धाश्रमाच्या प्रभारी रेखा सिंह यांनी स्पष्ट केलं. या अर्जात नाथू सिंह यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशीलही दिला आहे. एक घर. 10 एकर जमीन आणि अचल संपत्तीचा त्यात समावेश आहे. ही सर्व संपत्ती त्यांच्या निधनानंतर सरकारकडे जाईल, असं अर्जात नमूद केलं आहे.