AIIMS: देशातील एम्सची नावं बदलणार; मोदी सरकारचा प्रस्ताव तयार ; आता स्वातंत्र्य सैनिकांच्या नावानं ओळखली जाणार एम्स

| Updated on: Aug 22, 2022 | 10:24 AM

संस्थांना ठळकपणे स्थानिक किंवा प्रादेशिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, संस्था असलेल्या क्षेत्राची विशिष्ट भौगोलिक ओळख आणि परिसरातील प्रमुख ऐतिहासिक घटना किंवा स्मारके यांची नावे देण्यात येणार आहेत.

AIIMS: देशातील एम्सची नावं बदलणार; मोदी सरकारचा प्रस्ताव तयार ; आता स्वातंत्र्य सैनिकांच्या नावानं ओळखली जाणार एम्स
Follow us on

नवी दिल्लीः केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने (Modi Government) आता देशभरातील सर्व 23 एम्सची नावं बदलण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावामध्ये प्रादेशिक भागातील वीर, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक घटना (Heroes, freedom fighters, historical events)  किंवा त्या प्रदेशातील स्मारके किंवा त्यांची विशिष्ट भौगोलिक ओळख असलेल्या गोष्टीवरून त्यांच्या आधारावर दिल्लीसह सर्व एम्सला (AIIMS) खास नावं देण्याची योजना आखण्यात आली आहे. देशातील AIIMS संस्थांची नावे प्रादेशिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक घटना किंवा प्रदेशातील स्मारके किंवा त्यांच्या अद्वितीय भौगोलिक ओळखीच्या आधारावर ठेवण्यात येतील. मोदी सरकारने या विषयावर प्रस्ताव तयार केला आहे.

मंत्रालयाकडून हालचाली सुरू

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून यासाठी आता हालचाली चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून या नावांबाबत भारतात असलेल्या 23 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) कडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतेक एम्सकडून नावांची यादी सादर करण्यात आली आहे. याबाबत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे की, एम्स हे देशात त्यांच्या सर्वसामान्य नावानेच फक्त ओळखले जाते. तसेच या संस्था फक्त त्यांच्या स्थानावरूनही ओळखल्या जातात. ज्याप्रकारे दिल्ली दिल्ली एम्स एवढ्याच नावाने ही रुग्णालये ओळखली जातात. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व 23 एम्सना विशिष्ट नावे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये कार्यरत असणारी अंशतः कार्यरत असणारी किंवा ज्या एम्सचे बांधकाम चालू आहे त्यांचाही यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशिष्ट नावांसाठी सूचना मागविल्या

त्यासाठी एम्सच्या विविध संस्थांकडून विशिष्ट नावांसाठी सूचना मागविण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले आहे. संस्थांना ठळकपणे स्थानिक किंवा प्रादेशिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, संस्था असलेल्या क्षेत्राची विशिष्ट भौगोलिक ओळख आणि परिसरातील प्रमुख ऐतिहासिक घटना किंवा स्मारके यांची नावे देण्यात येणार आहेत. यापैकी बहुतांश एम्सकडून प्रमुख आरोग्य संस्थांनी सुचविलेल्या नावांसाठी तीन ते चार नावांची निवड करण्यात आली आहे.

देशातील एम्सची ही आहे स्थिती

एम्स बाबतीत महत्वाची गोष्ट ही आहे की, प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात सहा नवीन एम्स होणार आहेत त्यामध्ये बिहार (पाटणा), छत्तीसगड (रायपूर), मध्य प्रदेश (भोपाळ), ओडिशा (भुवनेश्वर), राजस्थान (जोधपूर) आणि उत्तराखंड (ऋषिकेश) मंजूर करण्यात आले होते. ही एम्स आता पूर्णपणे कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, 2015 ते 2022 दरम्यान स्थापन झालेल्या 16 एम्सपैकी 10 मध्ये एमबीबीएस आणि बाह्यरुग्ण विभागाच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, तर इतर दोन संस्थांमध्ये केवळ एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्यात आले असून उर्वरित चार संस्थेतून अजून कामं सुरू आहेत.