‘लव्ह जिहाद’ वर योगी सरकारचा दणका; गुन्ह्यातील पहिल्याच आरोपीचं आयुष्य तुरुंगात सडणार

| Updated on: Sep 18, 2022 | 3:01 PM

लव्ह जिहादवर जोरदार चर्चा झाल्या असल्या तरी योगी आदित्यनाथ सरकारने मात्र त्यावर आता ठोस भूमिका घेत कारवाईला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यातील पहिल्याच आरोपीला जोरदार झटका दिला आहे.

लव्ह जिहाद वर योगी सरकारचा दणका; गुन्ह्यातील पहिल्याच आरोपीचं आयुष्य तुरुंगात सडणार
Follow us on

अमरोहाः देशातील वेगवेगळ्या राज्यात धर्मांतर (conversion) आणि फसवणूक करुन विवाह करणे (Fraudulent marriage) हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहे. या अशा घटनांना एका वर्गाने त्याला लव्ह जिहाद असं नाव दिलं आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील आढळलेल्या पहिल्या आरोपीला आता तुरुंगावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने (Uttar Pradesh Yogi Adityanath Govt) मागील वर्षीच लव्ह जिहादववर एक कायदा आणला होता.

त्याच उत्तर प्रदेश धर्मांतर प्रतिबंध कायदा, 2021 अंतर्गत, या आरोपीला यूपीच्या अमरोहा जिल्ह्यातील न्यायालयाकडून दोषी ठरवले गेले आहे. न्यायालयाने 26 वर्षीय अफजलला पाच वर्षांची शिक्षा ठोठवली आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक, अभियोक्ता आशुतोष पांडे यांनी याविषयी सांगताना म्हणाले की, डिसेंबर 2021 मध्ये नवीन कायदा लागू केला होता, त्यानंतर पहिल्यांदाच या नवीन कायद्यानुसार अमरोहा न्यायालयाने ही शिक्षा ठोठवली आहे. अफझलला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 40 हजारचा दंड ठोठावण्यात आली आहे.

अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली 4 एप्रिल 2021 रोजी अमरोहा पोलिसांनी अफझलला दिल्लीतून अटक केली होती.

यामध्ये दुसऱ्या समाजातील 16 वर्षीय मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी उत्तर प्रदेश धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत हसनपूर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद केला होता.

या प्रकरणातील मुलीच्या वडिलांनी जे रोपवाटिका चालवण्याचे काम करतात, त्यांनी असा दावा केला होता की, त्यांची मुलगी कामासाठी म्हणून घरातून बाहेर निघून गेली होती.

त्यानंतर मात्र ती परत आलीच नाही. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासानंतर 16 वर्षाच्या मुलीला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

मुलीच्या वडिलांची रोपवाटिका असल्याने रोप खरेदी करण्यासाठी अफजल नेहमी त्यांच्या रोपवाटीकेवर येत होता. त्यानंतर मुलीचे अपहरण करुन तिचे धर्मांतर केले होते.

त्यामुळे योगी सरकारने अस्तित्त्वात आणलेल्या नव्या कायद्यांतर्गत आरोपीला पाच वर्षाचा तुरुंगावस ठोठवण्यात आला आहे. तर त्याला 40 हजारचा दंडही लागू केला आहे.