Patiala Jail : मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघणारा सिद्धू तुरुंगात क्लार्क; सोबतीला दलेर मेहंदीही आहेच; दोघंही एकाच बराकीत

| Updated on: Jul 17, 2022 | 12:00 AM

नवज्योत सिंग सिद्ध 34 वर्षापूर्वीच्या रस्ता अपघातात दोषी आढळला आहे, काही दिवसापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयातून सुटका झाली नव्हती, त्यामुळे त्याला पोलिसांसमोर शरणागती पत्कारावी लागली होती. त्यानंतर सिद्धूला पटियालाच्या मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले होते.

Patiala Jail : मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघणारा सिद्धू तुरुंगात क्लार्क; सोबतीला दलेर मेहंदीही आहेच; दोघंही एकाच बराकीत
Follow us on

पटियालाः काँग्रेस नेता आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्नं बघणारा नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि पंजाबचा प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी (Singer Daler Mehandi) सध्या पटियालातील मध्यवर्ती तुरुंगात बंदिस्त आहेत. या दोघांनाही एकाच बराकीत (single barrack) ठेवण्यात आले आहे. तुरुंग प्रशासनाने एकत्रच ठेवण्याबरोबरच त्या दोघांना कामाची जबाबदारीही देण्यात आली आहे. सिद्धूला तुरुंगात क्लार्कचे काम देण्यात आले आहे तर दलेर मेहंदींना लेखकाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिद्धू आणि मेहंदी यांच्या या प्रकरणाचा निकाल वेगवेगळ्या न्यायालयानी दिले होते. सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा झाली आहे तर दलेर मेहंदी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवज्योत 34 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात आत

नवज्योत सिंग सिद्धूला 34 वर्षापूर्वीच्या रोडरेज प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची सुटका करण्यात आली नव्हती, त्यामुळे त्याला पोलिसांनी शरण यावे लागले होते. तो पोलिसांच्या स्वाधीन आल्यानंतर त्याला पटियालाच्या मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले. तर पंजाबी गायक दलेर मेहंदीला 18 वर्षापूर्वी मानवी तस्करीचा ठपका ठेवून पटियाला न्यायालयाकडून त्याला दोषी ठरवण्यात आले होते, त्याप्रकरणी त्याला दोन वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्यानंतर दलेर मेहंदीला मग पटियालाच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यामुळे या दोघांनाही आता एकाच बराकीत ठेवण्यात आले आहे.

सिद्धूला सांधेदुखीचा त्रास

मिळालेल्या माहितीनुसार पटियाला तुरुंगामध्ये सिद्धू क्लार्क आहे तर दलेर मेहंदी लेखनिक झाला आहे. सध्या सिद्धूला सांधेदुखीचा त्रास सुरु झाल्याने सिद्धूसाठी आता बराकीत आरामदायी बेड ठेवण्यात आला आहे. तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, सध्या सिद्धूचे वजन प्रचंड वाढले आहे, त्यामुळे त्याला त्रास जाणवतो आहे. वजन वाढल्यामुळे त्याला उठताना, बसताना आणि चालताना त्रास होऊ लागला आहे.

कैदी नंबर…

पटियाला तुरुंगामध्ये नवज्योत सिद्धूचा कैदी नंबर म्हणून 241383 मिळाला असून तो 10 नंबरच्या बराकीमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. एक वर्षाची सजा भोगणाऱ्या सिद्धूने एक दिवसाची कैदीही त्याने काही दिवसापूर्वी भोगली होती. मात्र आता 364 दिवसांचा तुरुंगवास सध्या भोगत आहे. त्याच्या खाण्यापिण्यावरुन बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या होत्या. शिक्षा भोगण्यासाठी आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात सिद्ध तुरुंगातील जेवण जेवत नव्हता, त्यावेळी तो सांगत होता की,मला गव्हाच्या पदार्थांची अॅलर्जी आहे, त्यामुळे त्यानं तुरुंगातील दाल रोटी खाण्यास नकार दिला होता, त्यावेळी तो फक्त फळं खात होता. सिद्धूच्या माध्यम सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले की, सिद्धू यांना गव्हाची अॅलर्जी आहे. तो गव्हाची रोटी खाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आणि डाएट प्लॅननुसार रोज सकाळी रोजमेरी चहा, अर्धा ग्लास रस किंवा नारळपाणी घेण्यास सांगितले आहे.