पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता या दिवशी जमा होणार खात्यावर ; पण या गोष्टी अजिबात चुकवू नका…

| Updated on: Oct 10, 2022 | 2:37 PM

केंद्र सरकारकडून भूमी अभिलेख पडताळणीही केली जात आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे हस्तांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता या दिवशी जमा होणार खात्यावर ; पण या गोष्टी अजिबात चुकवू नका...
Follow us on

नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून (Central Government) सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांची पात्रता तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही पात्रता तपासण्यासाठी भूमी अभिलेख पडताळणी आणि ई-केवायसी (EKYC) केली जात आहे. त्यामुळे हे पडताळणीचे काम आता राज्य सरकारकडून केले जात आहे. शेतकऱ्यांची सर्वात मोठी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता या महिन्यात लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार आहे.

शेतकरी ऑगस्ट महिन्यांपासून 2 हजार रुपयांचा हप्त्याची वाट पाहत आहेत. तरीही केंद्र सरकारकडून उशीर केला जात आहे.

कारण, केंद्र सरकारकडून भूमी अभिलेख पडताळणीही केली जात आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे हस्तांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत ही रक्कम जाहीर होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तोपर्यंत बहुतांश राज्यातून पडताळणीचे कामं पूर्ण केली जात आहेत.

या योजनेबद्दल राजस्थान सरकारने माहिती देताना सांगितले की, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विविध हप्त्यांमध्ये आतापर्यंत राज्यातील 77.50 लाख शेतकऱ्यांना 13, 614.63 कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. त्या या योजनेंतर्गत 82.02 लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

त्यापैकी 77.50 लाख शेतकऱ्यांना पात्रता तपासण्यासाठी जमिनीचा तपशील पडताळणी आणि ई-केवायसी करण्याचे निर्देश भारत सरकारकडून देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांची जमीन अभिलेख पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यांचे रेकॉर्ड पीएम किसान पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पुढील 12 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

भारत सरकारकडून पीएम किसान योजनेचे आगामी हप्ते शेतकऱ्यांच्या आधार कार्डला लिंक केल्या गेलेल्या बँकेच्या खात्यांमध्ये हा हफ्ता हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.