तर संपूर्ण पाकिस्तान हादरवून टाकणार…सीमाच्या पाकिस्तानी पतीवर सचिन भडकला

| Updated on: Apr 06, 2024 | 11:15 AM

sachin seema love story: सचिनसाठी सीमाने धर्म बदलला. आता ती मांगेत सिंदूर भरते. मंगळसूत्र घालते. ती म्हणाली होती, मी आता ठकुराईन झाली आहे. माझे नाव सीमा सचिन ठाकूर आहे. सचिनचे आणि माझे प्रेम पब्जीमुळे झाले. यामुळे पब्जी आमच्या जीवनात लवजी बनून आला.

तर संपूर्ण पाकिस्तान हादरवून टाकणार...सीमाच्या पाकिस्तानी पतीवर सचिन भडकला
Follow us on

मागील वर्षी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह भारतात आली. सचिन आणि तिची प्रेमकथा त्यानंतर चांगलीच चर्चेत आली होती. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सीमा आणि सचिन यांची ओळख झाली. त्यानंतर सीमा पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात दाखल झाली. सीमा भारतात आल्यानंतर तिचा पहिला पती गुलाम हैदर धमक्या देत आहे. सतत सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून तो सचिनविरोधात बोलत आहे. आता सचिनने पाकिस्तानी गुलामला धमकी दिली आहे.

काय म्हणाला सचिन

सीमा हैदरचे पती सचिन याने एका चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी गुलाम सतत धमक्या देत असल्याबद्दलचा प्रश्न त्याला विचारण्यात आला. गुलाम त्या चार मुलांवर दावा करत आहे. त्यावर सचिन म्हणाला, गुलाम चार वर्षांपूर्वी मुलांना सोडून का गेला होता? आता त्याला मुलांची आठवण का होत आहे? धमकी देण्याचा प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, “मी बोलत नाही. परंतु मी बोलण्यास सुरुवात केली तर संपूर्ण पाकिस्तान हादरवून टाकेल.” सचिन पुढे म्हणाला, काही बोलायचे असेल तर प्रेमाने बोला. प्रेमानेच कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकतो.

नेपाळमधून भारतात आली होती सीमी

सचिन आणि सीमाची लव्ह स्टोरी माध्यमांमध्ये आल्यानंतर सचिनच्या घरी देशविदेशातील मीडिया प्रतिनिधी पोहचले. तिच्या मुलाखाती आल्या. सीमा सचिनसाठी पाकिस्तान सोडून नेपाळमधून भारतात आली होती. सीमा भारतात आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. गुप्तचर यंत्रणेकडून तिची कसून चौकशी झाली. या सर्व प्रकरणानंतर सचिन मीणा याने सीमाशी लग्न केले. सीमा हिने एक युट्यूब चॅनल सुरु केले. तिच्यातून तिला उत्पन्न सुरु झाले.

हे सुद्धा वाचा

सचिनसाठी सीमाने धर्म बदलला. आता ती मांगेत सिंदूर भरते. मंगळसूत्र घालते. ती म्हणाली होती, मी आता ठकुराईन झाली आहे. माझे नाव सीमा सचिन ठाकूर आहे. सचिनचे आणि माझे प्रेम पब्जीमुळे झाले. यामुळे पब्जी आमच्या जीवनात लवजी बनून आला. पब्जी या गेममुळेच मला सचिन सारखा प्रेम करणारा पती मिळाला आहे. पाकिस्तानामध्ये त्या गुलाम माझे जीवन नर्क केले होते.