सख्ख्या भावाने अजित पवार यांची साथ सोडली, पण शरद पवार यांचे हे नातेवाईक आले सोबत

baramati lok sabha constituency: बारामतीमधील ही लढत दोन पक्षांमधील राहिली नाही. एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमध्ये होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. अजित पवार यांना विरोध करणारे विजय शिवतारेही आता शांत झाले आहे. यामुळे अजित पवार यांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. 

सख्ख्या भावाने अजित पवार यांची साथ सोडली, पण शरद पवार यांचे हे नातेवाईक आले सोबत
पांडुरंग पवार यांनी घरावर बोर्ड लावला आहे.
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 10:27 AM

राज्यातील नाही तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोघांमध्ये लढत आहे. नणंद-भावजयमध्येच लढत होत आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन वेगळी वाट धरणारे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यावेळी अजित पवार यांच्या विरोधात सर्व पवार कुटुंब गेले आहे. अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार अजित पवार यांच्या विरोधात गेले आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीकाही केली होती. परंतु या संकटकाळात शरद पवार यांचे सावत्र थोरले भाऊ अजित पवार यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा दिला.

घरावर लावला बोर्ड

एकीकडे अजित पवार यांच्या सख्या भावाने साथ सोडली. परंतु आता शरद पवार यांचे सावत्र थोरले बंधू अजित पवार यांच्या सोबतीला आले. त्यांनी घरावर बोर्ड लावत अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेच आमचे कुटुंब असल्याचे म्हटले आहे. काटेवाडीतील शरद पवार यांचे थोरले सावत्र बंधू पांडुरंग पवार यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे.

पांडुरंग पवार कुटुंब पूर्ण ताकतीने अजित पवार यांच्या बरोबर उभे राहिले आहे. एकीकडे एकीकडे अजित पवार यांच्या कुटुंबातील सख्ख्या नात्यातील लोकांनी साथ सोडली असताना शरद पवार यांच्या सावत्र भावाच्या कुटुंबाने मात्र अजित पवारांच्या बाजूने ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही अजितदादांना सोडणार नाही

पांडुरंग पवार ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाले, आता माझे वय ७६ झाले आहे. परंतु मी लहाणपणापासून अजित पवार यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांचे आमच्यावर प्रेम आहे आणि आमचेही त्यांच्यावर प्रेम आहे. यामुळे आम्ही अजितदादांची साथ सोडणार नाही. त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत.

बारामतीमधील ही लढत दोन पक्षांमधील राहिली नाही. एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमध्ये होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. अजित पवार यांना विरोध करणारे विजय शिवतारेही आता शांत झाले आहे. यामुळे अजित पवार यांना आणखी एक दिलासा मिळाला आहे.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.