AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan vs Afgainstan : पाकिस्तानचे दिवस भरले, मुनीरचं काही खरं नाही, एअर स्ट्राइकनंतर अफगाण तालिबानची बदल्याची शपथ

Pakistan vs Afgainstan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धाने भयंकर वळण घेतलं आहे. पाकिस्तानने काबूलच्या एका रुग्णालयावर एअर स्ट्राइक केला. यात 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. 250 पेक्षा अधिक जखमी आहेत.

Pakistan vs Afgainstan : पाकिस्तानचे दिवस भरले, मुनीरचं काही खरं नाही, एअर स्ट्राइकनंतर अफगाण तालिबानची बदल्याची शपथ
Pakistan Attack on KabulImage Credit source: Reuters
| Updated on: Mar 17, 2026 | 9:52 AM
Share

पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमध्ये मागच्या 10 दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. काल रात्री 9 वाजता पाकिस्तानने ‘ऑपरेशन गजब लिल हक’ अंतर्गत काबूलवर आतापर्यंतचा मोठा एअर स्ट्राइक केला. यात एका हॉस्पिटलला टार्गेट करण्यात आलं. अफगाणी अधिकाऱ्यांनुसार या हल्ल्यात 400 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 250 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने सरकारने या हल्ल्याचं फुटेज प्रसिद्ध केलं असून ही सैन्य तळांवरील कारवाई असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगानिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद टोलो न्यूज़शी बोलताना म्हणाले की, “आता पाकिस्तानसोबत चर्चा, कूटनितीची वेळ संपली आहे. अफगाणिस्तान या हल्ल्याचा बदला घेणार” डूरंड लाइनजवळ दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे. तणावाने टोक गाठलं आहे.

युद्धाच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांमध्ये शाब्दीक लढाई आणि परस्परांविरोधात सैन्य कारवाई सुरु आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी आधीच इशारा दिलेला की, जर काबूलवर हल्ला झाला, तर पुढचं टार्गेट इस्लामाबाद असेल. नुकताच तालिबानने पाकिस्तानच्या इस्लामाबाद, क्वेटा आणि रावळपिंडीमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या महत्वपूर्ण नूर खान एअरबेसला टार्गेट केल्याचा तालिबानने दावा केला होता.

पाकिस्तानचं म्हणणं काय?

पाकिस्तानने काबूल आणि नंगरहारमध्ये केलेल्या हल्ल्यांचं समर्थन केलं. या हल्ल्यांना आपल्या सुरक्षेसाठी योग्य ठरवलं. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच स्टेटमेंट दिलेलं की, अफगाण तालिबानने पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य करुन रेड लाइन पार केली आहे. याच वक्तव्यानंतर काल रात्री काबूलवर मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक करण्यात आली. पाकिस्तानात जिथून हल्ले सुरु होते, हल्ल्याचा प्लान बनवला जायचा आम्ही त्याच ठिकाणी हल्ले केले असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.

लक्षात राहिलं असं उत्तर देऊ

दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती आहे. डूरंड लाइन जवळ दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे. मोठ्या प्रमाणात परस्परांवर हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानने काबूलच्या रुग्णालयावर हल्ला केला. त्याचं व्हिडिओ फुटेज जारी केल्यानंतर अफगाणिस्तानात संतापाची भावना आहे. आम्ही या हल्ल्याला लक्षात राहिलं असं उत्तर देऊ असं तालिबानने म्हटलं आहे. त्यामुळे हा संघर्ष मोठ्या युद्धात बदलण्याची भिती आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल