AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Air Strike : पाकिस्तानने 400 लोक मारले, खवळलेला अफगाणी क्रिकेटर राशिद खान म्हणाला, तुम्ही जाणीवपूर्वक करा किंवा चुकून पण हा…

Pakistan AirStrike : पाकिस्तानने काल रात्री काबूलच्या एका हॉस्पिटलवर एअर स्ट्राइक केला. ही अत्यंत अमानवीय कृती आहे. यात जवळपास 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचा अलीकडच्या काळातील अफगाणिस्तानवरील हा सर्वात भीषण हल्ला आहे.

Pakistan Air Strike : पाकिस्तानने 400 लोक मारले, खवळलेला अफगाणी क्रिकेटर राशिद खान म्हणाला, तुम्ही जाणीवपूर्वक करा किंवा चुकून पण हा...
Rashid Khan Image Credit source: PTI
| Updated on: Mar 17, 2026 | 9:16 AM
Share

काबूलमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवरुन अफगाणिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू राशिद खान पाकिस्तानवर चिडला आहे. त्याने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. राशिद खान हे टी20 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. तो अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आहे. पाकिस्तानच्या या एअर स्ट्राइकमध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयावर हा एअर स्ट्राइक केला. ड्रग सेवन करणाऱ्यांवर उपचार या हॉस्पिटलमध्ये केले जायचे. पाकिस्तानच्या या एअर स्ट्राइकमध्ये जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलचा बराचा भाग उद्धवस्त झाला आहे. 250 पेक्षा जास्त लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

राशिद खानने अत्यंत कठोर शब्दात पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. “नागरिकांना लक्ष्य करणं, शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय सुविधांना टार्गेट करणं हा युद्ध गुन्हा आहे. तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं की, नाही याने काही फरक पडत नाही” असं राशिद खान म्हणाला. पाकिस्तानच्या या कृतीमुळे फूट, द्वेष अजून वाढणार आहे असं तो म्हणाला. “मानवी हक्क आयोगाने हस्तक्षेप करुन पाकिस्तानने हा जो अत्याचार चालवलाय त्याची चौकशी करावी” अशी मागणी राशिद खानने केली आहे.

राशिद खानने अजून काय म्हटलय?

“काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये निरपराध नागरिक मारले गेले, याचं मला खूप दु:ख आहे. नागरिकांच्या घरांना लक्ष्य करणं, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर यांना जाणीवपूर्वक किंवा चुकून टार्गेट करणं हा युद्ध गुन्हाच आहे. तुम्ही मानवी जीवनाचा आदर करत नाही हे यातून दिसतं, खासकरुन रमजानच्या पवित्र महिन्यात. ही खूप चिंताजनक बाब आहे” असं राशिद खानने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे.

काळजाला भिडणारी पोस्ट

“आज रात्री काबूलमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व अपेक्षा विझल्या. जे तरुण उपचार घेत होते, त्यांची पाकिस्तानी राजवटीने बॉम्ब हल्ल्यात हत्या केली. आई गेटवर वाट पाहत उभी होती. मुलाच्या नावाने हाक मारत होती” अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटर मोहम्मद नबीने ही काळजाला भिडणारी पोस्ट केली आहे. पाकिस्तानने हे दावे फेटाळून लावले आहेत. नागरी वस्त्यांवर नाही, तर आम्ही दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले केले असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...