AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा शेट्टीच्या त्या फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद, अखेर न्यायालयाने काय दिले आदेश?

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण 'त्या' फोटोबाबात कोर्टात मोठा युक्तीवाद करण्यात आला... जाणून घ्या अखेर न्यायालयाने काय दिले आदेश?

शिल्पा शेट्टीच्या त्या फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद, अखेर न्यायालयाने काय दिले आदेश?
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
| Updated on: Mar 17, 2026 | 9:59 AM
Share

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील शिल्पा एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे, शिल्पा हिच्या एका फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद पार पडला. यामध्ये न्यायालयाने महत्त्वाचे आदेश देत, शिल्पा हिला मुंबई हायकोर्टाचा दिलासा दिला आहे…

काही महिन्यांपूर्वी शिल्पा हिचे काही ‘डीपफेक’ व्हिडीओ व्हायरल झाले होते. जे कोर्टाने तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडिओ व फोटो संबंधित वेबसाईटवरून हटवण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाख करणाऱ्या शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

अभिनेत्रीच्या संबंधित डीपफेक व्हिडिओ, फोटो आणि लिंक्स 8 दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश हायकोर्टाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले आहेत. काही अज्ञात व्यक्ती आणि संकेतस्थळांनी संमतीशिवाय आक्षेपार्ह पंटेंट तयार केल्याने प्रतिमा मलिन होत असून खासगी आयुष्यावर गदा येत असल्याचा दावा करत शिल्पा शेट्टी हिने हायकोर्टात धाव घेतली होती. ज्यावर कोर्टाने निर्णय सुनावला आहे.

न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर शिल्पाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. देशमुख यांनी सुनावलेल्या निर्णायानुसार, कोणत्याही व्यक्तीची, विशेषतः महिलेची प्रतिमा अशा प्रकारे मांडली जाऊ शकत नाही जेणेकरून तिच्या सन्मानाला धक्का बसेल असं स्पष्ट करत न्यायालयाने आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

सांगायचं झालं तर, फक्त शिल्पा शेट्टीच नाही तर, झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींचे ‘डीपफेक’ व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्रींबद्दल अनेक नको त्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या, अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांचे ‘डीपफेक’ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले.

यावर झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. रश्मिका हिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे… अशी पोस्ट सोशल मीडियावर केलेली… एवंढच नाही तर, AI ची वाईट बाजू देखील अनेक सेलिब्रिटींनी मांडलेली…

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल