AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव, थेट अमेरिकेच्या गुप्तचर अहवालामुळे मोठा हाहाकार, खामेनेई यांच्याकडून..

अमेरिका आणि इस्त्रायल मोठे हल्ले करत असतानाही इराण हार मानत नसून जोरदार वार करत आहे. डोनाल्ड ट्रम्प कुठेतरी या युद्धात एकटे पडल्याचे दिसत आहे. यासोबतच अमेरिकेपेक्षा इराण या युद्धात वरचढ ठरताना दिसत आहे. यादरम्यान धक्कादायक अहवाल पुढे आला.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव, थेट अमेरिकेच्या गुप्तचर अहवालामुळे मोठा हाहाकार, खामेनेई यांच्याकडून..
US President Donald Trump
| Updated on: Mar 17, 2026 | 9:35 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्ध टोकाला पोहोचले आहे. इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्येही इराण ढगमगताना दिसत नाही. इराण युद्धाच्या मैदानात ताकदीने उतरला आहे. हेच नाही तर काहीही झाले तरीही अमेरिकेच्या पुढे झुकणार नसल्याचा इशारा अगोदरच इराणकडून देण्यात आला. इराणी जनता आपले रक्त सांडण्यास तयार आहे पण आपली एक इंचही जमीन अमेरिकेला देण्याच्या तयारीत नाही. अमेरिका इराण युद्धाला आज 18 दिवस पूर्ण झाले असून कुठेतरी अमेरिका या युद्धात मागे पडली. होर्मुज खाडी इराणकडून अजूनही बंद करण्यात आली. अमेरिकेसह अन्य देशांचे मोठे जहाज तिथे अडकल्याने जग संकटात आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिका इतर कोणत्याही देशाची मदत मिळत नाहीये. इराणसोबतचे युद्ध कुठेतरी अमेरिकेच्याच गळ्यातील फास दिसतोय. इराणविरोधात एकही देश अमेरिकेच्या बाजूने पुढे येत नाही. यामुळे या युद्धात कुठेती मोठी नामुष्की अमेरिकेवर झाली.

अमेरिका आणि इस्रायलकडून सतत हवाई हल्ले होत असूनही इराणची इस्लामिक राजवट तशीच सुरक्षित आहे. इराणच्या सर्वाेच्च नेत्याला टार्गेट करून अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ल्यात ठार केले. तरीही इराण ताठ उभा आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, युद्धामुळे इराणची लष्करी क्षमता कमकुवत झाली आहे, मात्र त्यांची शक्ती रचना तशीच आहे, त्याला कोणीही संपू शकले नाही.

हेच नाही तर राजकीय आणि सुरक्षा व्यवस्था इराणची अधिक कडक होऊ शकते. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी त्यांच्या हयातीत स्थापित केलेली शक्ती रचना आता इस्लामिक राजवट टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका बजावत आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, इराणची राजकीय परिस्थिती सुरक्षा व्यवस्थेला मजबूतपणे धरून ठेवते. नेतृत्वात बदल झाला असला तरी, सत्तेचे प्रत्यक्ष नियंत्रण या व्यवस्थेकडेच आहे. खामेनेईंच्या कार्यकाळात सुरक्षा यंत्रणा आणि धार्मिक नेतृत्व यांच्यात संतुलन निर्माण झाले होते. जे आता इतक्या मोठ्या युद्धात दिसून येत आहे. यामुळेच इतके मोठे हल्ले केले जात असतानाही इराण ताठ मानेने उभा आहे आणि लढत आहे. अमेरिकेला जे हवे आहे ते मिळणे कठीणच असल्याचे अहवालात म्हणण्यात आले.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल