AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धात दुश्मनही करणार नाही असे काम मित्रांनीच केल्याने डोनाल्ड ट्रम्प प्रचंड निराश, थेट म्हटले, ज्यांनी आम्ही..

अमेरिकेला इराणसोबतच्या युद्धात मोठे धक्के बसताना दिसत आहेत. परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाताना दिसत आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच एकही देश अमेरिकेने मदत मागूनही पुढे आला नसल्याने मोठा धक्का बसला. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प निराश झाल्याच बघायला मिळत आहेत.

युद्धात दुश्मनही करणार नाही असे काम मित्रांनीच केल्याने डोनाल्ड ट्रम्प प्रचंड निराश, थेट म्हटले, ज्यांनी आम्ही..
US President Donald Trump disappointed
| Updated on: Mar 17, 2026 | 8:56 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. आज या युद्धाला 18 दिवस झाले. मात्र, तरीही युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक देशात या युद्धामध्ये संकट आहे. गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. यासोबतच जागतिक बाजापेठ अस्थिर झाली असून तेलाच्या किमती वाढत असल्याने डोकेदुखी वाढली. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपर्यंतच आता हे युद्ध राहिले नसून अनेक देशांना फटका बसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आयात बंद आहे. शिवाय आखाती देशांमधील तेल रिफायनरीचे मोठे नुकसान या युद्धात झाले. सतत तेलाच्या प्रति बॅलरमध्ये वाढ असल्याने जग संकटात आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अमेरिकेवरील दबाव वाढला आहे. अमेरिकेने त्यांच्या स्वार्थासाठी जगाला वेठीस धरल्याचा आरोप केला जात आहे. या युद्धात इराणच्या मदतीला अनेक देश आले. मात्र, अमेरिकेने मदत मागूनही एकही देश पुढे मदतीकरिता आला नाही.

होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही देशांना आवाहन करण्यात आले आणि त्यांच्या युद्धनाैका होर्मुज खाडीत पाठवण्यास सांगितले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मला विश्वास आहे की, हे देश आपल्या युद्धनाैका खाडीत पाठवतील आणि होर्मुज सागरीमार्ग सुरक्षित होईल. मात्र, अमेरिकेच्या मदतीकरिता एकही देश पुढे न आल्याने मोठी खळबळ उडाली.

यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प निराश झाल्याचे बघायला मिळत आहेत. मदत मागूनही अनेक देशांनी मदत दिली नसल्याचे बघून त्यांनी थेट यावर भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प  यांनी म्हटले, काही देश याबद्दल खूप जास्त उत्साहित आहेत. पण काही देश काहीच करत नाहीत. या अशा देशांना आम्ही अनेक वर्षांपासून मदत करत आलो आहोत. त्यांना अत्यंत धोकादायक परिस्थितीमधून आम्ही काढले आणि त्यांचे संरक्षणही केले. पण आता ते उत्साही दिसत नाहीत.

इराणसोबतच्या युद्धाबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणसोबतचे युद्ध लवकर संपवायचे आहे आणि लवकरच हे युद्ध संपेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स, जर्मनी, चीन आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांना थेट युद्धात होर्मुज खाडीत युद्धनाैका पाठवण्यास सांगितले. मात्र, याकरिता एकही देश पुढे आला नसल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...