Crime: धक्कादायक, मुलीची हत्या केली आहे, या आणि मृतदेह घेऊन जा, महिलेने केला पोलिसांना फोन

| Updated on: Aug 09, 2022 | 8:33 PM

19 वर्षांच्या तरुणीच्या नशेच्या सवयीमुळे, ही महिला वैतागलेली होती. त्यामुळे वैतागलेल्या या महिलेने उशीने या तरुणीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली.

Crime: धक्कादायक, मुलीची हत्या केली आहे, या आणि मृतदेह घेऊन जा, महिलेने केला पोलिसांना फोन
धक्कादायक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गाझियाबाद – एका आईने (Mother)आपल्या मुलीची गळा दाबून हत्या (Killed her girl) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने स्वताच फोन करुन ही माहिती पोलिसांना कळवली (called police)आणि त्यानंतर ती घटनास्थळावरुन फरार झाली. उत्तर प्रदेश गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. या फोननंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला आहे. आता या प्रकरणात पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुलीच्या नशेच्या सवयीमुळे आई होती हैराण

19 वर्षांच्या तरुणीच्या नशेच्या सवयीमुळे, ही महिला वैतागलेली होती. त्यामुळे वैतागलेल्या या महिलेने उशीने या तरुणीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. मुलगी अमरीन हिला नशेचे व्यसन होते, त्यामुळे ती सतत घर सोडून पळून जात असे. त्यामुळे आई सतत चिंतेत राहत असे. पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे. आता या पळून गेलेल्या महिलेचा शोध पोलीस घेत असून तिला तातडीने अटक करण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दोन लहान मुलांना पाठवले बाहेर

या हत्या करणाऱ्या महिलेच्या पतीचा आधीच मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. छोटी, मोठी कामे करुन ही महिला घरखर्च चालवित होती. आरोपी नफीसा ही लाजपतनगरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. अमरीनची हत्या करण्यापूर्वी तिने आपलया दोन मुलांना बाजारात बटाटे आणण्यासाठी पाठवले, त्यानंतर तिने तिची मुलगी अमरीन हिची हत्या केली. या घटनेनंतर तिची दोन्ही मुले नसरीन आणि असद हे दोघेही हत्येच्यावेळी घराबाहेर गेलेले होते.

हे सुद्धा वाचा

हत्येनंतर फरार, मोबाईलही बंद

आरोपी नफीसा हिच्या नवऱ्याचा मृत्यू एका वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर घरातील मोठी मुलगी असलेली अमरीन हिचे व्यसन सुरु झाले होते. नसरीन हिची हत्या केल्यानंतर फारर झालेल्या नफिसाने आपला मोबाईलही बंद करुन ठेवला आहे. पोलीस आता तिला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुलींमध्ये नशेखोरीचे प्रमाण वाढते

गेल्या काही काळापासून तरुण मुलीही नशेच्या आहारी जात असल्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. घरात मोठ्या माणसांचा धाक नसलेल्या तरुणींमध्ये हे प्रमाण अधिक प्रमाणात दिसते आहे. घराबाहेर नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी असलेल्या मुलींमध्येही नशेचे प्रमाम दिवसेंदिवस वाढते आहे. या नशेखोरीच्या सवयीतूनच या महिलेने तिच्या मुलीची हत्या केली आहे.  या सवयीने एक संपूर्ण कुटुंब मात्र वाऱ्यावर आले आहे.