बहीण अधिकारी होताच, भावांनी अभिमानाने खांद्यावर बसवून गावातून आनंदानं फिरवलं…

| Updated on: Nov 28, 2022 | 7:59 PM

हेमलता पोलीस उपनिरीक्षक बनली असली तरी, तिच्यासाठी हे यश सहजसाध्य नव्हतं. शाळेसाठी ते एक दोन नव्हे तर 14 कि.मी. चालत ती शाळेत जात होती.

बहीण अधिकारी होताच, भावांनी अभिमानाने खांद्यावर बसवून गावातून आनंदानं फिरवलं...
Follow us on

जयपूरः माणसांच्या आयुष्यात असं सर्रासपणे म्हटले जाते की, माणसाच्या अडचणी माणसाला थांबवू शकतात, पण त्याला त्या तोडू शकत नाहीत आणि वाकवूही शकत नाहीत. अशीच गोष्ट बाडमेरमधील एका अंगणवाडी सेविका असलेल्या व्यक्तीला थांबवू शकल्या नाहीत. म्हणूनच आपल्या हिमतीवर आणि आपल्या प्रयत्नांवर त्या मुलीने आपल्या अंगावर खाकी वर्दी खेचून आणली आहे. या परिसरातील ती पहिली पोलीस उपनिरीक्षक बनली आहे. तिचे नाव आहे हेमलता. हेमलता ज्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बनून घरी आली त्यावेळी तिच्यासह तिच्या घराच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

गावातील लोकांनी ती घरी आल्या आल्या तिला खांद्यावर बसवून तिली गावातून अभिमानानं फिरवून आणले. यावेळी ती घरात आली त्यावेळी तिचं गीत गाऊन स्वागतही करण्यात आले.

पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या बारमेरच्या सारनू या छोट्याशा गावातील हेमलता जाखड ही या परिसराताली पहिलीवहिली अधिकारी महिला बनली आहे.

त्यामुळेच तिचे वडील दुर्गाराम जाखड यांना तिचा प्रचंड अभिमान आहे. हेमलताने आपले ध्येय ठरवले होते, म्हणूनच ती अंगणवाडी सेविका असतानाही ती सतत अभ्यासात गर्क असायची. अभ्यास करून तिने राजस्थानमध्ये परीक्षा दिली आणि तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडही झाली.

हेमलता आता अधिकारी बनली असली तरी तिचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतच सरनुचिमांजी येथे झाले होते. नववी ते बारावी पर्यंत तर शिक्षणासाठी ती रोज चौदा किलोमीटर चालत सरणूतील शाळेत जात होती. वडील शेतकरी असल्याने शाळेचे दिवस ती सामान्यपणे जगली होती.

हेमलता आपल्या या यशाबद्दल सांगाताना म्हणते की 2021 मध्ये माझी राजस्थान पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. माझी निवड होईपर्यंत सरणूसह माझ्या गाव परिसरातील मी पहिलीच पोलीस अधिकारी झाले होते.

एकही पुरूष किंवा एकही महिला आमच्या या परिसरातून अधिकारी झाली नव्हती. आज जरी माझ्या अंगावर वर्दी असली तरी या वर्दीचे वेड अगदी लहान असल्यापासून होते. त्यामुळेच ही वर्दी मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून ही वर्दी मिळवली आहे.

हेमलता सांगते की, माझं आणि माझ्या घरच्या लोकांचे सगळं आयुष्य अगदी पारंपरिक खेडेगावात गेले आहे. त्यामुळे मी अभ्यास करताना माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना लोकांचा प्रचंड त्रास झाला आहे.

लोकांचे टोमणे सहन करत या पदापर्यंत मला पोहचता आलं आहे. त्यामुळे हे छोटंमोठं मिळालेलं यश असलं तरी ते सहजसाध्य मिळाले नाही.

मला खेळाचीही प्रचंड आवड आहे. मी राज्यस्तरीय कबड्डी संघात खेळली खेळाडूही आहे. हे यश माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलाचे आणि माझ्या बहीण भावांचे असल्याचे ती अभिमानाने सांगते.

मुलगी अभ्यास करत होती, त्या काळात गावातील अनेक लोकं आपल्याला टोमणे मारायचे, मुलीला बोलायचे अंस हेमलताच वडील सांगतात.

मात्र ते हेही सांगतात की, माझ्या मुलीवर माझा प्रचंड विश्वास होता, त्याचवेळी वाटत होतं की, माझी मुलगी एक ना एक दिवस नक्की अधिकारी होऊनच ती घराचं नाव उज्वल करणार.