महिला बँक मॅनेजरच्या धाडसाला सलाम, कात्रीचा धाक दाखवून वाचवला सगळा पैसा; व्हिडीओ व्हायरल…

| Updated on: Oct 17, 2022 | 8:04 PM

चोरटा ज्यावेळी बँकेत हातात चाकू घेऊन आणि धमकावत आला त्यावेळी महिला बँक मॅनेंजरने कशाचीही तमा न बाळगता त्याच्यावर हल्ला करुन बरोबर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

महिला बँक मॅनेजरच्या धाडसाला सलाम, कात्रीचा धाक दाखवून वाचवला सगळा पैसा; व्हिडीओ व्हायरल...
Follow us on

नवी दिल्लीः राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये एका महिला बँक मॅनेंजरच्या (Lady Manger) धाडस आणि युक्तीमुळे बँकेतील 30 लाख रुपयांची होणारी लूट वाचवण्यात यश आले आहे. महिला मॅनेजरने बँक लूटणाऱ्यांना असा काही धडा शिकवला आहे की, त्यांच्या तो कायम लक्षात राहणर आहे. राजस्थान ग्रामीण मरुधारा बँकेत दरोडा (bank robbery) टाकण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याबरोबरच थेट महिला बँक व्यवस्थापकाने दोन हात केले. ज्यावेळी चोरटा बँक लूटण्यासाठी बँकेत आला त्यावेळी चाकू घेऊनच तो घुसला मात्र त्याचवेळी टेबलवर पडलेल्या कात्री घेऊन त्याच्यावर हल्ला केला गेला.

कात्रीने चोरट्यावर हल्ला करण्यात आला त्यावेळी मात्र तो बावचळला आणि त्यानंतर लगेच त्यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लविश अरोरा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत जाऊन चोरट्याला ताब्यात घेतले.

चोरट्याचा हा सगळा कारनामा बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाल आहे. ही घटना घडताच काही वेळा नंतर मात्र बँकेतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चोरटा ज्यावेळी बँकेत हातात चाकू घेऊन आणि धमकावत आला त्यावेळी महिला बँक मॅनेंजरने कशाचीही तमा न बाळगता त्याच्यावर हल्ला करुन बरोबर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, शनिवारी हा आरोपी चाकू घेऊन बँकेत अचानक घुसला होता. त्यावेळी त्याचा संपूर्ण चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता.

त्यानंतर चाकूचा धाक दाखवून चोरट्याने बँक कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी पैसै लूटण्यासाठी म्हणून ज्यावेळी बँकेच्या महिला मॅनेंजरकडे तो गेला तेव्हा मात्र त्या महिला अधिकारी असणाऱ्या महिलेने कात्रीने त्याच्यावर हल्ला केला.

ही घटना घडत असताना बँकेत 30 लाख रोख रक्कम होती, मात्र महिला मॅनेंजरनी धाडस दाखवल्यामुळे हे 30 लाख रुपये वाचल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले.