DRDO : मानव विरहित विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी, उड्डाणापासून लँडिंगपर्यंत सर्वकाही ऑटोमॅटिक

हे मानव विरहित विमान आहे. यामध्ये टर्बोफॅन इंजीन आहे. एअरफ्रेम आणि खालची रचना, चाकं, उड्डाण नियंत्रण आणि एव्हीओनिक्स प्रणाली या सर्व गोष्टी देशातच तयार करण्यात आल्यात. यात टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हेगेशन आणि स्मूथ टचिंग सिस्टीमचा समावेश होता.

DRDO : मानव विरहित विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी, उड्डाणापासून लँडिंगपर्यंत सर्वकाही ऑटोमॅटिक
उड्डाणापासून लँडिंगपर्यंत सर्वकाही ऑटोमॅटिक
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 01, 2022 | 8:02 PM

मुंबई : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) अत्याधुनिक मानव विरहित विमान विकसित करण्यात शुक्रवारी मोठं यश मिळालंय. DRDO नं स्वायत्त फ्लाईंग विंग (Autonomous Flying Wing ) टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचे (Technology Demonstrator) पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पार पाडले आहे. या विमानानं उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामं ऑटोमॅटिक करण्यात आली. कर्नाटकातील चित्रदुर्गमधील (Karnataka, Chitradurga) एअरोनॅटिक टेस्ट रेंजमध्ये हा प्रयोग आज यशस्वी करण्यात आला. किती वेळ याचं उड्डाण होऊ शकते, हे स्पष्ट झालं नाही. हा यशस्वी प्रयोग म्हणजे संरक्षण तंत्रज्ञानात मैलाचा दगड ठरेल, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

संरक्षण तंत्रज्ञानात उपयोग

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या विमानाचं उड्डाण पूर्णपणे मानव विरहित आहे. चाचणीच्या वेळी विमानाचं उड्डाण खूप चांगलं होतं. हे उड्डाण पूर्णपणे स्वयंचलित होतं. मानव विरहित विमानाच्या विकासात महत्वाचं तंत्रज्ञानासाठी हा प्रयोग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. संरक्षण तंत्रज्ञानात भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल राहील.

मानव विहरित विमानाचं वैशिष्ट्ये काय

बेंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाला एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टॉब्लिशमेंट (एडीई) ने तयार केले. त्याचा विकासही एडीईनं केलाय. हे मानव विरहित विमान आहे. यामध्ये टर्बोफॅन इंजीन आहे. एअरफ्रेम आणि खालची रचना, चाकं, उड्डाण नियंत्रण आणि एव्हीओनिक्स प्रणाली या सर्व गोष्टी देशातच तयार करण्यात आल्यात. यात टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हेगेशन आणि स्मूथ टचिंग सिस्टीमचा समावेश होता.

राजनाथ सिंहांनी केलं अभिनंदन

डीआरडीओच्या या यशस्वी प्रयोगाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून अभिनंदन केलंय. ते म्हणाले, मानव रहित यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन. स्वायत्त विमानं तयार करण्याच्या दिशेनं हे मोठं पाऊल आहे. यामुळं लष्करी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीनं स्वावलंबी भारत मोहिमेचा मार्ग मोकळा होणार आहे.