Sharad Pawar : निवडणूक शपथपत्र प्रकरण, शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

शरद पवार यांना आयकर विभागाचं लव्ह लेटर!

Sharad Pawar : निवडणूक शपथपत्र प्रकरण, शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत
Image Credit source: tv9
आयेशा सय्यद

|

Jul 01, 2022 | 1:51 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक शपथपत्रात दाखवलेल्या संपत्तीसाठी ही नोटीस देण्यात आली आहे.  ही नोटीस निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आहे. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रांसंदर्भात आयकर विभागाने (Income Tax Department) शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मला आयकर विभागाची प्रेमपत्र मिळाली आहेत, असं पवार म्हणाले आहेत.  2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या संदर्भात आयकर विभागाकडून प्रेमपत्र मिळाली आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.  आयकर विभागाने आतापर्यंत नोटीस दिल्याचं वृत्त फेटाळलेलं नाही.

आयकर विभागाचं लव्ह लेटर!

भाजप सरकारच्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. त्याचवेळी त्यांनी आपल्याला आयकर विभागाची प्रेमपत्र आल्याचं म्हटलंय. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या संदर्भात आयकर विभागाकडून प्रेमपत्र मिळाली आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

राऊतांची ईडी चौकशी

संजय राऊत हे आज ईडी कार्यालयात दुपारी चौकशीसाठी दाखल झालेत.  “मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. काळजी करू नका.” असं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर रहावे अशी त्यांना नोटीस आली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वकीलामार्फत कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. आज सकाळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शिंदेंना शुभेच्छा!

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसयांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याला नवं सरकार मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकार टिकवण्यात उद्धव ठाकरे, तुम्ही कमी पडलात का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट. 38 आमदार बाहेर जातात, ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचं यश आहे’. याच पत्रकार परिषदेत त्यांनी आयकर विभागाच्या नोटीसीवरही भाष्य केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें