AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UBT-MNS Alliance : ठाकरे-मनसेच्या युतीपुढे सर्वात मोठं संकट, बंडखोरांनी केला मोठा गेम; शेवटच्या दिवशी थेट…

मुंबई महानगरपालिकानिवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे यांच्यात युती झाली आहे. असे असतानाच आता ठाकरे गट आणि मनसेमधील काही नेत्यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

UBT-MNS Alliance : ठाकरे-मनसेच्या युतीपुढे सर्वात मोठं संकट, बंडखोरांनी केला मोठा गेम; शेवटच्या दिवशी थेट...
raj thackeray and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 30, 2025 | 8:06 PM
Share

Mumbai Municipal Corporation Election : राज्यात महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर रोजी संपलेली आहे. अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी, वाद, भांडण पाहायला मिळाले. काही ठिकाणी तर तिकीट न मिळाल्याने निष्ठावंतांनी आक्रोशही केला. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच प्रक्रिया संपलेली असल्यामुळे प्रचाराला रंग चढणार आहे. मुंबई महापालिकेत यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत आहेत. या मनसे-ठाकरे गटाच्या युतीमुळे मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. मनसेसोबतच्या युतीला न जुमानता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी बंडकोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेमध्येही काही नेत्यांनी अशाच प्रकारे पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नेमकी कुठे कुठे बंडखोरी झाली?

९५ चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार हरी शास्त्री – ठाकरे)

१०६ सागर देवरे, ठाकरे (अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी – मनसे)

११४ अनिशा माजगावकर, मनसे (अधिकृत उमेदवार राजोल पाटील – ठाकरे)

१६९ कमलाकर नाईक, ठाकरे (अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकार – ठाकरे)

१९३ सूर्यकांत कोळी, ठाकरे (अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर – ठाकरे)

१९६ संगीता जगताप, ठाकरे (अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर – ठाकरे)

२०२ विजय इंदुलकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव – ठाकरे)

२०३ दिव्या बडवे, ठाकरे (अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर – ठाकरे)

ठाकरे-मनसे युतीपुढे मोठे आव्हान

दरम्यान, मुंबई तसेच राज्यात इतर महापालिकांसाठी मनसे आणि ठाकरे गटाने युती केलेली असली तरी मुंबईत झालेल्या बंडखोरीमुळे या युतीपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. श्रद्धा जाधव या मुंबईच्या माजी महापौर होत्या. त्या 202 वॉर्डातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. परंतु याच वॉर्डामधून ठाकरे गटाचे विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. अशा महत्त्वाच्या जागांवर ठाकरे-मनसेच्या युतीत बंडखोरी होत असेल तर निवडणूक जिंकण्याचे या युतीपुढे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?