महायुतीला मुंबईत मोठा धक्का! बडा पक्ष थेट बाहेर, बसणार मोठा फटका?
नुकताच एका बड्या नेत्याने महायुतीमधून बाहेर पडून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी थेट मुंबईतील उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. हा महायुतीला मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय-ए)ने भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला ‘विश्वासघात’चा आरोप करत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. आठवले यांनी महायुतीकडून दुजाभाव झाल्याचे सांगताना पक्षाच्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
आठवलेंनी व्यक्त केली खंत
महायुतीने भाजपला 137 आणि शिंदे सेनेला 90 जागा वाटप करून करार जाहीर केला. मात्र, आरपीआयला त्यात स्थान न मिळाल्याने आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भाजपने रात्री उशिरा केवळ 7 जागांचा प्रस्ताव दिला, परंतु ऐनवेळी नवीन ठिकाणी उमेदवार उभे करणे आता अशक्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातून जागा देण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरीही उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी काहीच कार्यवाही झाली नाही अशी खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी
-स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
-रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
-बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
-सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
-रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
-दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
-ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
-प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
-संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
-संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
-निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
-गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
-विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
-मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
-श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
-मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
-नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
-सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
-विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
-नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
-विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
-रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
-राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
-हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
-राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
-भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
-सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
-यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
-अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
-रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
-छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
-अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
-जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
-बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
-वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
-राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
-प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
-धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
-शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150
महायुतीला बसणार फटका?
मुंबईतील काही भागांत आंबेडकरी समाजाची मजबूत पकड आहे आणि रामदास आठवले यांच्या आवाहनामुळे हा समाज आतापर्यंत महायुतीच्या बाजूने उभा राहिला होता. आता रिपाईने स्वबळावर उमेदवार उतरवल्यास दलितबहुल वॉर्डांमध्ये मतविभाजन होऊन भाजप आणि शिंदे गटाला फटका बसू शकतो.
