सेक्स वर्क हे देखील एक प्रोफेशनच- सुप्रीम कोर्ट! पण प्रोफेशनल्स कोण? कळेल कसं?

| Updated on: May 26, 2022 | 3:38 PM

महत्त्वाची बाब म्हणजे सेक्स वर्क करणं बेकायदेशीर नसलं, तरी वैश्यालय चालवणं हे बेकायदेशीर, असंदेखील कोर्टानं म्हटलंय. म्हणचेच सेक्स वर्क मध्ये सहभागी होणं किंवा सेक्स वर्क करणं हे बेकायदेशीर नसलं, तरी कुंटणखाना चालवणं अवैध असणार आहे.

सेक्स वर्क हे देखील एक प्रोफेशनच- सुप्रीम कोर्ट! पण प्रोफेशनल्स कोण? कळेल कसं?
सेक्स वर्क हे देखील एक प्रोफेशनच- सुप्रीम कोर्ट! पण प्रोफेशनल्स कोण? कळेल कसं?
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : 26 मे हा दिवस ऐतिससिक ठरला. देशभरात सेक्स वर्कशी संबंधित असलेल्यांना या निर्णयानं मोठा दिलासा दिला. सेक्स वर्क हा एक पेशा अर्थात प्रोफेशन आहे आणि या प्रोफेशनला समान न्याय मिळायलाच हवा, असा सुप्रीम कोटानं (Supreme Court) म्हटलंय. सेक्स वर्क करणाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये, असंही कोर्टानं पोलिसांना म्हटलंय. 18 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती आपल्या संमतीनं जर सेक्स वर्क करत असले, तर तो अपराध मानला जाणार नाही( Profession) , असंही कोर्टानं म्हटलंय. पोलिसांनी सेक्स वर्क करणाऱ्यांसोबत अदबीनं वागावं, असंही कोर्टानं म्हटलंय. देशातील सर्व राज्यांना केंद्रशासिक प्रदेशातील पोलिसांनी (Police) तसे आदेशदेखील पोलिसांनी दिले आहे. कोर्टानं दिलेल्या या आदेशानंतर आता सेक्स वर्कर नेमकं कुणाला म्हणायचं? सेक्स वर्क करणारे प्रोफेशनल्स कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. नेमकं कोर्टानं काय म्हटलंय? आणि या निर्णयाचे नेमके अर्थ काय आहेत? जाणून घेऊयात..

काय म्हणतंय सुप्रीम कोर्ट?

सेक्स वर्कर यांनाही कायद्याने समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे वकील जस्टीस एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपन्ना यांच्या खंडपीठानं सुनावणी झाली. या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं सेक्स वर्कर्सचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या अनुशंगानं 6 निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांद्वारे सेक्स वर्कर्सच्या समान संरक्षणाचं हक्क अबाधित राहणार आहेत, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

पोलिसांना कोर्टानं काय म्हटलं?

सेक्स वर्कर हा एक पेशा असून या पेशालाही तितकंच संरक्षण मिळायला हवं. इतर सर्वसामान्य प्रोफेशन्ल प्रमाणे या सेक्स प्रोफशन्लही सर्व अधिकारांसाठी बांधिल आहेत. त्यामुळे पोलिसांनी, एखादी प्रौढ व्यक्ती मर्जीनं सेक्स वर्क करत असेल, तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही. अशा व्यक्तीला अटक करुन त्यास त्रास देऊ नये, असं कोर्टानं पोलिसांनी उद्देशून म्हटलंय. अनुच्छेद 21 नुसार कोर्टानं सगळ्यांना सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचं पालन पोलिसांकडूनही होणं गरजेचंय.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाची बाब म्हणजे सेक्स वर्क करणं बेकायदेशीर नसलं, तरी वैश्यालय चालवणं हे बेकायदेशीर, असंदेखील कोर्टानं म्हटलंय. म्हणचेच सेक्स वर्क मध्ये सहभागी होणं किंवा सेक्स वर्क करणं हे बेकायदेशीर नसलं, तरी कुंटणखाना चालवणं अवैध असणार आहे.

कोण कोणत्या देशात कायदेशीर?

भारतात जरी कुंटणखाना हा बेकायदेशीर असलं, तरी जगातील काही देशांत वैश्या व्यवसाय हा अधिकृत मानला गेलेला आहे. वैश्याव्यवसायाला मान्यता असणारे एकूण 15 पेक्षा जास्त देश असून या देशांत वैश्या व्यवसाय करणं गैर मानलं जात नाही. स्कूपव्हूपने दिलेल्या रिपोर्टनुसार, खालील देशांमध्ये अधिकृतपणे कुंटणखाने चालवले जातात.

  1. न्यूझीलंड
  2. ऑस्ट्रेलिया
  3. ऑस्ट्रिया
  4. बांगलादेश
  5. बेल्जिअम
  6. ब्राझील
  7. कॅनडा
  8. कोलंबिया
  9. डेनमार्क
  10. फ्रान्स
  11. जर्मनी
  12. ग्रीस
  13. इंडोनेशिया
  14. नेदरलॅन्ड
  15. इक्वोदौर
  16. स्वित्झर्लंड

कोरोना काळात सेक्स वर्कर्स असलेल्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. आपल्यावर आलेल्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी एका याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. दरम्यान, कोर्टानं सरकार आणि सेवाक्षेत्राशी संबंधित असलेल्या कायदेशीर जाणकारांना एक वर्कशॉपचं आयोजन करण्यासंही सांगितलंय. सेक्स वर्कर्स यांना आपले अधिकार कळावे, त्यांना कायदेशीर प्रक्रिया कळावी, आपल्यावर अज्ञान अत्याचार झाल्यान, त्यावर वाचा फोडण्यासाठी नेमकी काय पावलं उचलायला हवी, या अनुशंगानं मार्गदर्शन व्हावं, यासाठी वर्कशॉपचं आयोजन करण्याचे निर्देशही कोर्टानं दिले आहेत.

दरम्यान, सेक्स वर्क हे एक प्रोफेशन जरी असलं, तरी या प्रोफेशला समाजात मान्यता मिळेल का, हाही प्रश्न कायम आहे. तसंच हा पेशा करणारे स्वतः ही बाब मान्य करण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहेत का, असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सेक्स वर्क हे प्रोफेशन असल्याचं सुप्रीम कोर्टानं जरी मान्य केलं असलं, तरी समाजात या प्रोफेशनला मान्यता मिळणं अवघड असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. मात्र भारतीय संस्कृतील लपून छपून आणि वाईट नजरेनं पाहिल्या जाणाऱ्या सेक्स वर्कर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी तरी किमान प्रबोधन केलं जाईल, हेही नसे थोडके. त्यामुळे सेक्स वर्कर्स कोण, याला कायदेशीर मान्यता कशी मिळेल, हाही प्रश्न कायमच आहे.