Video : ‘फर्स्ट हिट! हार्ड हिट!’, भारतीय नौदलाचा नवा मंत्र, पाणबुडीविरोधी स्टेल्थ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Video : 'फर्स्ट हिट! हार्ड हिट!', भारतीय नौदलाचा नवा मंत्र, पाणबुडीविरोधी स्टेल्थ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारतीय नौदलाने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. यामुळे आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी पृष्ठभागावरून हवेत अँटी-सबमरीन स्टील्थ फ्रिगेट वापरता येईल. यामुळे नौदलाची ताकद वाढली आहे

आयेशा सय्यद

|

May 26, 2022 | 11:49 AM

मुंबई : आजचा दिवस भारतीय नौदलासाठी (Indian Navy) ‘फर्स्ट हिट! हार्ड हिट!’, असा आहे. कारण आज भारतीय नौदलाच्या नव्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. पाणबुडीविरोधी स्टेल्थ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झालीये. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. क्षेपणास्त्र अँटी-सबमरीन स्टेल्थ फ्रिगेटमधून (Missile Anti Submarine Atealth Frigate) प्रक्षेपित केल्यानंतर SAM प्रणाली अविश्वसनीय वेगवान होतेय. हे झालेल्या चाचणीतून पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. यामुळे इप्सित ध्येयापर्यंत पोहोचण्यास भारतीय नौदलाला मदत होईल. याचा एक व्हीडिओही नौदलाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारतीय नौदल’फर्स्ट हिट! हार्ड हिट!’

आज भारतीय नौदलाच्या नव्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. पाणबुडीविरोधी स्टेल्थ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झालीये. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. क्षेपणास्त्र अँटी-सबमरीन स्टेल्थ फ्रिगेटमधून प्रक्षेपित केल्यानंतर SAM प्रणाली अविश्वसनीय वेगवान होतेय.हे पुराव्यानिशी झालेल्या चाचणीतून सिद्ध झालं आहे. ‘फर्स्ट हिट! हार्ड हिट!’ असा उल्लेख नौदलाच्या वतीने करण्यात आला आहे.

भारतीय नौदलाने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. यामुळे आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी पृष्ठभागावरून हवेत अँटी-सबमरीन स्टील्थ फ्रिगेट वापरता येईल. यामुळे नौदलाची ताकद वाढली आहे. नौदलाने याविषयी सांगितलं की, ‘फर्स्ट हिट, हार्ड हिट’ या मंत्राच्या दिशेने आम्ही हे पाऊल टाकलं आहे. हे पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र शत्रूवर छुप्या पद्धतीने हल्ला करण्यास सक्षम आहे.”

नौदलाचं ट्विट

भारतीय नौदलाच्या वतीने एक ट्विट करण्यात आलं आहे. “नौदलाचं आणखी एक पुढचं पाऊल… आपल्या नौदलाची मार्गदर्शित-क्षेपणास्त्र अँटी-सबमरीन स्टेल्थ फ्रिगेट सर्वोत्तम काम करतंय. त्याच्या एसएएम प्रणालीसह कमी उड्डाण करणारं,आमचं लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. ‘फर्स्ट हिट आणि हार्ड हिट’, हा आमचा आता मंत्र असणार आहे”, असं ट्विट करण्यात आलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें