AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 स्पर्धेत न्यूझीलंडचा युएईवर विक्रमी विजय, एलन आणि सेफर्टचं शतक!

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 11व्या सामन्यात न्यूझीलंड आणि युएई हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने युएईचा 10 विकेटने धुव्वा उडवला. या विजयासह काही विक्रम आपल्या नावावर केले आहे.

T20 World Cup 2026 स्पर्धेत न्यूझीलंडचा युएईवर विक्रमी विजय, एलन आणि सेफर्टचं शतक!
T20 World Cup 2026 स्पर्धेत न्यूझीलंडचा युएईवर विक्रमी विजय, एलन आणि सेफर्टचं शतक!Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 10, 2026 | 6:35 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड आणि युएई यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईच्या बाजूने लागला. पण सामन्यावर पकड न्यूजीलंडने मिळवली. युएईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या. तसेच विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान न्यूझीलंडने एकही गडी न गमावता पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या फिन एलेन आणि टिम सेफर्ट जोडीने युएईच्या गोलंदाजांना झोडून काढलं. पावर प्लेमध्ये या जोडीने 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दोघांनी अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही या जोडीने आक्रमक खेळी सुरूच ठेवली. या जोडीने विकेट गमावली नाही आणि विजय मिळवून दिला. टिम सेफर्टने नाबाद 89 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. तर फिन एलनने 50 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 5 षटकार मारले. न्यूझीलंडने अफगाणिस्तानंतर युएईला पराभूत केलं.  टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडने काही विक्रमांची नोंद केली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. आतापर्यंत कोणत्याही विकेटसाठी इतकी मोठी भागीदारी झालेली नाही. फिन एलन आणि टिम सेफर्ट यांनी नाबाद 175 धावांची भागीदारी केली.

फिन एलन आणि टिम सेफर्ट या जोडीने टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध इंग्लंडच्या एलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी केलेल्या 170 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.

टी20 क्रिकेटमध्ये एकही विकेट न गमवता 150 हून अधिक धावांचा पाठलाग करणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला आहे. यात पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी असून त्यांनी इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये कराचीत 200 धावांचा पाठलाग विकेट न गमवता केला होता.

टी20 वर्ल्डकप 2007 पासून 10 विकेट राखून विजय मिळवण्याची ही सातवी वेळ आहे.2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध, 2012 मध्ये दक्षिण अफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्ध, 2021 मध्ये ओमानने पीएनजीविरुद्ध, 2021 मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध, 2022 मध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध, 2024 मध्ये इंग्लंडने युएसएविरुद्ध आणि आता न्यूझीलंडने युएईविरुद्ध विजय मिळवला आहे.

फिन एलनने नाबाद 84 आणि टिम सेफर्टने नाबाद 89 धावांची खेळी केली. पण तरीही या दोघांच्या नावावर शतक नोंदवलं गेलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये या दोघांनी षटकारांचं शतक पूर्ण केलं.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी जोरदार फटकेबाजी करत पावरप्लेमध्ये 78 धावा केल्या. सेफर्टने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर त्याचा जोडीदार फिन एलनने 27 चेंडूत तोच टप्पा गाठला.

150हून अधिक धावाचा पाठलाग करताना 28 चेंडू शिल्लक ठेवण्याचा टी20 वर्ल्डकपमधील तिसरा विक्रम आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील स्कॉटलँड ओमान सामन्यात 41 चेंडू शिल्लक, तर 2014 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड आयर्लंड सामन्यात 37 चेंडू शिल्लक राहिले होते.

Follow Us
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा