AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीचा पहीलाच पेपर, विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून दुर्देवी मृत्यू, प्रचंड गर्दीमुळे तोल गेला

बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना डोंबिवलीतील एका विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल गेल्याने या विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचे म्हटले जात आहे.

बारावीचा पहीलाच पेपर, विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून दुर्देवी मृत्यू, प्रचंड गर्दीमुळे तोल गेला
dombivli local accident
| Updated on: Feb 10, 2026 | 7:00 PM
Share

बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या असताना आज पहिला पेपर असताना गर्दीमुळे लोकलमधून पडून डोंबिवलीतील बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीच्या घटनेमुळे लोकलमधील गर्दीचा प्रश्न उभा राहिला आहे. सोहम सचिन कठरे ( वय १८ ) असे या दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव असून सकाळी ९.१५ वाजता सुमारास कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेला सोहम सचिन कठरे हा ( वय १८ वर्षे ) लोकलच्या डब्यातून तोल जाऊन खाली पडला. सकाळी ९.१५ वाजता सुमारास कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे सोहमचा तोल गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोहम डोंबिवली येथे राहत होता आणि कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल येथे १२ वी सायन्समध्ये तो शिक्षण घेत होता.

जवळपास परीक्षा केंद्र द्यावीत

डोंबिवली येथे राहाणाऱ्या सोहम याचे कळवा येथील मनिषा विद्यालय येथे परीक्षा केंद्र होते. बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या रेल्वे सुरक्षेसाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी अशी मागणी सोहमच्या नातेवाईक यांनी केली आहे. तसेच रेल्वे, शिक्षण मंडळ, शिक्षण मंत्री आणि शाळा प्रशासन यांना सामाजिक कार्यकर्ते भेटून निवेदन देणार आहेत. रेल्वेने लांबचा प्रवास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जवळपास परीक्षा केंद्र द्यावीत अशी मागणी करणार आहेत..

Follow Us
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल