AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agrawal Case : सिया गोलयची तुलना सुशांत सिंग राजपूतच्या एक्स-गर्लफ्रेंडशी, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणतोय, ‘आपण सर्वांनी ती सर्कस…’

Ketan Agrawal Case : केतन हत्याकांडाची चर्चा बॉलिवूडमध्ये सुद्ध, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सिया गोलयची तुलना केली, सुशांत सिंग राजपूतच्या एक्स-गर्लफ्रेंडशी, पोस्ट करत म्हणतोय, 'आपण सर्वांनी ती सर्कस...', अनेकांकडून संताप व्यक्त, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पोस्टचीच चर्चा...

Ketan Agrawal Case : सिया गोलयची तुलना सुशांत सिंग राजपूतच्या एक्स-गर्लफ्रेंडशी, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणतोय, 'आपण सर्वांनी ती सर्कस...'
Ketan Agrawal Case
| Updated on: Jul 03, 2026 | 8:32 AM
Share

Ketan Agrawal Case : दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी असं ट्विट केलं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सने त्याच्यावर निशाणा साधला आहे. संजय यांनी पुण्यातील केनत अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल हिची तुलना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स-गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या ‘मीडिया ट्रायल’शी केली आहे… ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त करत दिगग्दर्शकावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, केतन अग्रवाल याची हत्या झाल्यानंतर राज्यातच नाही तर, देशभरात खळबळ उडाली आहे. केतन हत्या प्रकरणात पोलीस चौकशी आणि केस सुरु असताना दिग्दर्शकाने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे..

संजय गुप्ता यांचं ट्विट

संजय गुप्ता एक्सवर ट्विट करत म्हणाले, ‘मी कोणता निर्णय सुनावत नाहीये आणि कोणाची बाजू देखील मांडत नाहीये. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की, आपण सिला हिच्यासोबत अशी वागणूक बंद केली पाहिजे, जशी रिया चक्रवर्ती हिच्यासोबत केलेली?’, ‘मीडिया ट्रायल’च्या दिशेने संकेत देत, दिग्दर्शक म्हणाले, ‘आपण सर्वांनी ती सर्कस पाहिली आहे आणि पुरावे न सापडल्याने निकाल काय लागला हे देखील पाहिलं आहे.’, गुप्ता यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. सांगायचं झालं तर, सुशांत याच्या हत्येनंतर रिया हिला अत्यंत वाईट रित्या ट्रोल करण्यात आलं.

सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरण

सुशांत याच्या मृत्यूनंतर रिया हिला बहिष्काराचा देखील सामना करावा लागलेला. एवढंच नाही तर, रिया हिला तब्बल 27 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागलेला. पण अनेक वर्ष कोर्टाच्या फेऱ्या मारल्यानंतर अखेर, अभिनेत्रीला सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात क्लिनचीट मिळाली. याप्रकरणातून बाहेर आल्यानंतर रिया हिने तिच्या वाईट काळाबद्दल मुलाखतींमध्ये सांगितलं. अखेर रिया हिने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

केतन अग्रवाल हत्याकांड

सुरुवाताली केतन याचा अपघात झाला, असं मानलं जात होतं. पण जसा तपास पुढे सरकत गेली, तरी प्रकरणाचं वास्तव सर्वांसमोर आलं. सिया आणि बॉयफ्रेंड चेतन यांनी मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिलं. सिया हिला केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. म्हणून तिने बॉयफ्रेंडच्या मदतीने केतन याला मारण्याची योजना आखली. आता प्रकरणी सिया आणि चेतन दोघे तुरुंगात असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग