AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुट्ट्या तेल बंदीची सामान्यांना झळ, तुकाराम मुंढे साहेब आम्ही खायचं तरी काय ? हातावरचे पोट असणाऱ्यांचा सवाल

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्टे तेल विक्रीचे फर्मान काढल्याने अनेक किराणा दुकानात सुट्टं खाद्यतेल मिळणार नाही अशा आशयाच्या पाट्या लागल्या आहेत.सुट्ट खाद्यतेल घेण्यासाठी हातात कॅन घेऊन आलेल्या नागरिकांना माघारी फिरावं लागत आहे.

सुट्ट्या तेल बंदीची सामान्यांना झळ, तुकाराम मुंढे साहेब आम्ही खायचं तरी काय ? हातावरचे पोट असणाऱ्यांचा सवाल
ias tukaram mundhe
| Updated on: Aug 22, 2026 | 7:29 PM
Share

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. एकीकडे त्यांच्या या कारवाईने मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असताना आता हातावरचे पोट असणाऱ्या आणि रोजचा किराणा खरेदी करुन घराची चुल पेटवणारा गरीब मात्र यात भरडला गेला आहे.याला सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी जबाबदार ठरली आहे.

एफडीएने सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचा थेट फटका ग्रामीण भागातल्या गोरगरीब कष्टकरी आणि मोल मजुरी करणाऱ्या नागरिकांना बसला आहे, सुट्टं तेल विकत घेण्यासाठी तेल विक्रेत्याकडे आलेले गावातील अनेक नागरिक निराश झाले आहेत. मात्र बदनापूर शहरातल्या किराणा दुकानात सुट्टे खाद्यतेल मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे. तर दुसरीकडे किराणा दुकानदारांना सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या आदेशाची धास्ती असल्याचे चित्र राज्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंडे यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही सुट्ट्या खाद्य तेलाची विक्री बंद केली असल्याचे किराणा दुकानदार सांगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पॅकिंगचे तेल घ्या असे आम्ही सांगत आहोत. जळगाव-

हातावर पोट आहे, रोजंदारी करतो, पॅकिंगचे तेल घेऊ शकत नाही, सुटे तेल मिळणार नाही तर घरात आम्ही खायचे काय आणि कसे? सुटे तेल भेसळयुक्त असते आणि पॅकिंग तेल भेसळयुक्त नसते याची काय गॅरंटी, गरिबांचा पण विचार करा असे गावकरी म्हणत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या सुटे तेल विक्री बंदीच्या निर्णयावर जळगावमधील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांनी उपस्थित केला आहे.

रोजंदारी मिळेल तसेच आम्ही जीवन जगतो पॅकिंग तेल घेण्याची आमच्यात कॅपॅसिटी नाही, मग त्याशिवाय खायचं कसं, राहायचं कसं, असं देखील महिलांनी म्हटलं आहे.पॅकिंगचे तेल घ्यायचं म्हटलं तरी भाव गगनाला भिडलेले आहेत. मग ते भाव कमी करा, कुठलाही निर्णय घेताना गरिबांचा विचार करा अशी विनंती देखील महिलांनी सरकारला केली आहे.

साखर,तेल सर्वच गोष्टींमध्ये महागाई वाढते आहे. मात्र रोजंदारी. मजुरी वाढत नाही त्याकडे देखील सरकारने लक्ष दिले पाहिजे.. असं मत देखील महिलांनी व्यक्त केले आहे. तेलातील भेसळ रोखण्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी सुटे तेल विक्री बंदी जाहीर केली आहे, या निर्णयावर जळगाव लगत परिसर तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या तीव्र  प्रतिक्रिया आल्या आहेत.

Follow Us
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?