AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीत बढती, व्यवसायात नफा; 25 नोव्हेंबरपासून ‘या’ 5 राशींचे नशिब चमकणार, बुधाचे नक्षत्र परिवर्तन ठरणार शुभ

Budh Nakshatra Parivartan: २५ नोव्हेंबर रोजी बुध विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार असून या बदलाचा ५ राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. ज्योतिषीय अंदाजानुसार, या राशींना नोकरीत नवीन संधी, बढती, व्यवसायात नफा आणि आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात. जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या ५ भाग्यशाली राशी.

नोकरीत बढती, व्यवसायात नफा; 25 नोव्हेंबरपासून ‘या’ 5 राशींचे नशिब चमकणार, बुधाचे नक्षत्र परिवर्तन ठरणार शुभ
| Edited By: | Updated on: Nov 21, 2026 | 5:56 PM
Share

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, नोकरी आणि व्यवसायाचा कारक मानले जाते. बुध ग्रहाच्या हालचालीतील बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असतो. येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी बुध विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी गुरू असल्यामुळे बुध आणि गुरू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव पाहायला मिळेल. ज्योतिषीय अंदाजानुसार, या नक्षत्र परिवर्तनामुळे ५ राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. नोकरीत नवीन संधी, बढती, पगारवाढ आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. पुढील १० दिवस कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरू शकतात, ते जाणून घेऊया.

वृषभ नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल आणि संवादकौशल्यात सुधारणा होईल. कामातील योगदानाची वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची ओळख वाढण्यास मदत होईल. धनु घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल. नोकरी करणाऱ्यांना बढतीसंदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र, नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. हळूहळू जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. मीन उत्पन्नाची स्थिती चांगली राहण्याची शक्यता असून पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि काम करण्याचा उत्साह वाढेल. मकर मकर राशीच्या लोकांना बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याचे संकेत आहेत. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी नवीन आणि फायदेशीर डील मिळू शकते. केलेल्या मेहनतीचे अपेक्षित फळ लवकर मिळू शकते. कन्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. एखाद्या जुन्या प्रकल्पावर पुन्हा काम सुरू होऊ शकते. तुमच्या संवादकौशल्याचा फायदा होईल आणि नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात