AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाड धाड…! पोलिसांकडून भल्या पहाटे हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपीने शस्त्र जप्तीच्या कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना त्याने गोळीबार केला. आरोपीच्या गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.  पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपल्बिक पोलीस […]

धाड धाड...! पोलिसांकडून भल्या पहाटे हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर
| Updated on: Jul 03, 2026 | 9:31 AM
Share

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपीने शस्त्र जप्तीच्या कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना त्याने गोळीबार केला. आरोपीच्या गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.  पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपल्बिक पोलीस स्टेशनमध्ये 2 जुलै रोजी मोहित शर्माच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी गौरव आणि त्याचा साथीदारावर नजर ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी 3 जुलै रोजी मुख्य आरोपी गौरवला ताब्यात घेतलं. गाझियाबाद पोलिसांचा दावा आहे की, हत्या प्रकरणातील आरोपीला शस्त्र जप्तीसाठी शांतीनगर येथील वॉटर प्लांट येथील डंपिंग यार्डात नेण्यात येत होते. त्याचवेळी आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळण्याच्या तयारीत होता.

…अन् आरोपी झुडपात लपला 

पोलिसांनी पुढे सांगितलं की, आरोपीने पोलिसांना चकमा देऊ पळ काढला. त्यानंतर जवळील झुडपात लपला. त्यानंतर त्याच्याजवळील गावठी पिस्तुलने पोलीस पथकावर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. आरोपी गोळीबारात जखमी झाल्यानंतर झुडपात पडला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.  पोलिसांकडून इतर संशयित आरोपींचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार

उत्तर प्रदेशच्या बरौत गावात सायंकाळच्या सुमारास तंबू व्यापारी आणि त्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांची हत्या झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दोघे 3 आठवड्यापूर्वी सायंकाळी दुकानात बसले होते, त्यावेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोघांवर जवळून गोळीबार केला. दोघांवर गँगस्टर वरुण लोहारी याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा