Corona Epidemic : राष्ट्रीय हरित लवाद्याचा यूपी-बिहारला सवाल? कोरोनाच्या काळात गंगेच्या काठावर किती मृतदेह सापडले?

| Updated on: May 17, 2022 | 7:10 PM

न्यायाधिकरणाने काही फौजदारी खटला दाखल झाला आहे का हे जाणून घेण्यास सांगितले. मृतदेह हाताळण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीवर कारवाई झाली की नाही? एनजीटीने पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि तसे असल्यास, खबरदारीच्या उपाययोजनांचा तपशील विचारला आहे.

Corona Epidemic : राष्ट्रीय हरित लवाद्याचा यूपी-बिहारला सवाल? कोरोनाच्या काळात गंगेच्या काठावर किती मृतदेह सापडले?
अंत्यसंस्कार
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना महामारीत (Corona Epidemic) अनेकांचे मृत झाले. तो काळ आजही डोळ्यासमोरून अनेकांच्या जात नाही. आजही फक्त कोरोना जरी म्हटलं तरी अनेकांना तो काळ आठवतो. जेव्हा एखाद्याची कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याला खांदा द्यायाला लोक ही पुढे येत नसत. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती तर अतिशय भयानक झाली होती. त्यावेळी तर लोकांना अग्नी द्यायाला आणि दफन करायला ही नंबरात उभे राहायला लागत होते. त्याचदरम्यान देशाच्या पवित्र अशा गंगा नदीत मात्र मृतदेह तरंगताना दिसले आणि अनेकांच्या डोळ्यावर विश्वास बसता बसत नव्हता अनेक जन ते मृतदेह गंगा नदीतील (River Ganga) नाहीत असा दावा करत होते. तर अनेक जनांकडून यूपी-बिहार सरकारवर जोरदार टीका ही झाली होती. आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारकडून कोविड-19 महामारीत 31 मार्चपर्यंत गंगेत तरंगणारे आणि नदीच्या काठावर पुरण्यात आलेल्या मानवी मृतदेहांच्या संख्येबाबत माहिती मागवली आहे. एवढेच नाही तर एनजीटीने असेही विचारले आहे की, बिहार सरकारने किती प्रकरणांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले किंवा अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत केली? गंगा नदीत मृतदेह वाहून जाणे किंवा नदीच्या काठावर मृतदेहांचे दफन थांबवण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली गेली?

नियमांचे उल्लंघन झाले आहे का

न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने बिहारच्या गृह आणि आरोग्य विभागाला या विषयावर तथ्यात्मक पडताळणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. न्यायाधिकरणाने काही फौजदारी खटला दाखल झाला आहे का हे जाणून घेण्यास सांगितले. मृतदेह हाताळण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीवर कारवाई झाली की नाही? एनजीटीने पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि तसे असल्यास, खबरदारीच्या उपाययोजनांचा तपशील विचारला आहे.

बक्सरमध्ये 40 मृतदेह एकत्र दिसले

कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंगेत मृतदेह वाहत होते. यूपी-बिहार सीमेवरील बक्सरमध्ये 40 मृतदेह एकत्र वाहत असल्याचे दिसले होते. मात्र, तेव्हा त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. हे मृतदेह यूपीमधून आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. वाढत्या वादानंतर हे मुद्दे गौण ठरले. बक्सर हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. मात्र, हे मृतदेह उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आणि वाराणसी येथून वाहून जाऊन येथे पोहोचल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते.

हे सुद्धा वाचा

गावांमध्ये मृत्यूची संख्या वाढू लागली

गेल्या दीड महिन्यापासून आसपासच्या गावात अचानक मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे बक्सरच्या चरित्रवन गावातील लोक सांगतात. मृत्युमुखी पडलेले सर्वजण खोकला आणि तापाने त्रस्त होते. येथील चौसा स्मशानभूमीत येणारे बहुतांश मृतदेह गंगेत टाकले जात होते. यातील शेकडो मृतदेह किनाऱ्यावर कुजत ही होते. चारित्रवनातील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कारासाठी जागाच उरली नसल्याचेही चरित्रवन गावातील लोक सांगतात.

घाटावर रात्रंदिवस शेकोटी पेटते

चारित्रवन आणि चौसा स्मशानभूमीत रात्रंदिवस चीता पेटत होत्या. स्मशानभूमीतही गर्दी होत असे. पूर्वी जिथे चौसा स्मशानभूमीत दररोज दोन ते पाच चिता जाळल्या जात होत्या, तिथे आता 40 ते 50 चिता जाळल्या जात होत्या. बक्सरमध्ये हा आकडा सरासरी 90 होता.

7 मृतदेह जाळले, 16 गंगेत फेकले

चरित्रवन स्मशानभूमीत एकावेळी 10 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. बक्सरमध्ये, रविवारी अधिकृत आकडेवारीत 76 मृतदेहांची नोंद झाली. तर 100 हून अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले होते. स्मशानभूमीत दररोज 20 हून अधिक लोक नोंदणीही करत नसत. चौसा येथेही 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यापैकी 7 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले, तर 16 मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर काही मृतदेह बाहेर आल्याचेही लोक सांगत आहेत.

एसडीओ म्हणाले – उत्तर प्रदेशातून मृतदेह

बक्सरचे एसडीओ केके उपाध्याय यांनी सांगितले की, गंगा नदीत 10-12 मृतदेह दिसले आहेत. हे 5 ते 7 दिवस आधीचे आहेत. वाराणसी आणि अलाहाबादच्या घाटातून वाहून ते बिहारमध्ये येत असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे. यूपी सरकारशीही आपण बोलणार आहे. त्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता एसडीओ पुन्हा एकदा चौसा स्मशानभूमीत पोहोचले. आता बहुतांश मृतदेह पुरले होते. हे मृतदेह किती वेळ पाण्यात होते, मृत्यूचे कारण काय हे जाणून घेण्यासाठी काही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचीही तयारीही करण्यात आली होती.

थांबवण्याच्या सूचना दिल्या

चौसा सीओ नवलकांत म्हणाले की, रात्रीच्या वेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात अडचण येत होती. त्यामुळे जनरेटर लाइटची व्यवस्था करण्यात आली. झालेली घाण साफ करण्यासाठी दोन लोकांना कामावर ठेवण्यात आले होते. तसेच तेथे दोन वॉचमन आणि एक सल्लागार नेमण्यात आला होता. जे अंत्यसंस्कार करतील आणि त्यांचा तपशीलही ते ठेवतील.