त्या घटनेमुळे घाबरलेली, हिंदू शेर सेनेला हिना बद्दल समजल्यानंतर त्यांनी….

| Updated on: Mar 30, 2024 | 11:40 AM

काही दिवसांपूर्वी बदायूची घटना घडली. त्यामुळे मी दडपणाखाली होते. आपल्यासोबतही असच काहीतरी घडू शकत, अशी भिती तिच्या मनात होती. हिंदू शेर सेनेला तिच्याबद्दल समजलं.

त्या घटनेमुळे घाबरलेली, हिंदू शेर सेनेला हिना बद्दल समजल्यानंतर त्यांनी....
Religious conversion
Follow us on

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये धर्म परिवर्तनाच एक प्रकरण समोर आलय. एका मुस्लिम मुलीने हिंदू मुलाबरोबर लग्न केलं. मुस्लिम मुलीचे हिंदू मुलाबरोबर अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या घरच्यांना हे नात मान्य नव्हतं. हिंदू संघटनेला दोघांच्या प्रेम संबंधांबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काली माता मंदिरात दोघांच लग्न लावून दिलं. मुलीच नाव आधी हिना होतं. ते बदलून आता संगीता झालय. काही दिवसांपूर्वी बदायूची घटना घडली. त्यामुळे मी दडपणाखाली होते, असं संगीताने सांगितलं. आपल्यासोबतही असच काहीतरी घडू शकत, अशी भिती तिच्या मनात होती. म्हणून वेळ असतानाच तिने प्रियकरासोबत लग्न केलं.

खैराबाद पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. गावात राहणाऱ्या हिनाच त्याच गावात राहणाऱ्या महेश बरोबर प्रेम संबंध होते. ज्यावेळी हिनाच्या कुटुंबीयांना या बद्दल समजलं, तेव्हा त्यांनी तिच्यावर अनेक बंधन घातली. त्यामुळे तिच घराबाहेर पडण बंद झालं. एवढ सगळ होऊनही हिना हिम्मत हरली नाही, ती लपून-छपून महेशला भेटतच होती.

मुस्लिम धर्म सोडला

हिंदू संघटनेला त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल समजल्यानंतर ते हिना आणि महेशशी बोलले. दोघेही लग्न करण्यासाठी तयार होते. गुरुवारी हिनाने मुस्लिम धर्म सोडला आणि हिंदू धर्मात प्रवेश केला. हिना हे आपल नाव बदलून संगीता केलं. हिंदू संघटनेच्या लोकांनी काली माता मंदिरात हिंदू पद्धतीने हिना आणि महेशच लग्न लावून दिलं.

विकास हिंदू काय म्हणाले?

हिंदू शेर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास हिंदू यांनी सांगितलं की, “अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघांनी जेव्हा त्यांच्याबद्दल आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्ही हिनाच नामकरण केलं. दोघांच मंदिरात धूम धडाक्यात लग्न लावून दिलं. महेश आणि संगीता आता दोघेही लग्नानंतर खुश आहेत”