राजधानी दिल्लीसह ‘या’ राज्यात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज…

| Updated on: Jan 21, 2023 | 11:51 PM

हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे की, 23 जानेवारीपासून उत्तर भारतात थंडी सुरू होणार असून 24 जानेवारीपासून आजूबाजूच्या पठारी प्रदेशावर त्याचा परिणाम होणार आहे.

राजधानी दिल्लीसह या राज्यात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज...
Follow us on

नवी दिल्लीः उत्तर भारतातील काही भागात बर्फवृष्टी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मैदानी भागातील नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळत आहे. तर येत्या काही दिवसांत पावसामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील आठवड्यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये 24 ते 26 जानेवारी दरम्यान हलका पावसाच्या सरीसह आणि आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

आयएमडीचे शास्त्रज्ञ एसएस रॉय यांच्या मते, 24 आणि 25 जानेवारीला जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

24 ते 26 जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये हलका पाऊस आणि ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
सध्या तापमानात घसरण सुरू असून, पुढील 5 दिवस ही घसरण कायम राहणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमानात घट होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे की, 23 जानेवारीपासून उत्तर भारतात थंडी सुरू होणार असून 24 जानेवारीपासून आजूबाजूच्या पठारी प्रदेशावर त्याचा परिणाम होणार आहे.

या महिन्याच्या उर्वरित दिवसात मुख्यतः आकाश निरभ्र आकाश आणि कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात राजधानीत थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशाच्या राजधानी दिल्लीत मात्र कमाल तापमान 23.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त असल्याचे सांगण्या आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे की, किमान तापमान 6.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.