Survey : पुरुषांपेक्षा महिलांचे सेक्स पार्टनर जास्त! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून चकीत करणारी आकडेवारी समोर

| Updated on: Aug 20, 2022 | 6:48 AM

पुरुषांपेक्षा महिलांचे सेक्स पार्टनर अधिक असलेल्यांमध्ये राजस्थान, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, आसाम, केरळा, लक्षद्वीप, पुद्दूचेरी आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

Survey : पुरुषांपेक्षा महिलांचे सेक्स पार्टनर जास्त! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून चकीत करणारी आकडेवारी समोर
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (National Family Health Survey) वतीने करण्यात एका सर्वेक्षण भारतातील (India News) राज्यांसह केंद्र शासित प्रदेशातही करण्यात आलं. या सर्वेक्षणाने नोंदवलेलं निरीक्षण चकीत करणार असल्याचं समोर आलंय. भारतात पुरुषांपेक्षा महिलांचेच सेक्स पार्टनर (Physical Relations) जास्त असतात, असं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून उघड झालं आहे. तशी आकडेवारीही समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. देशातील एकूण 707 राज्यांत 1.1 लाख स्त्रिया आणि 1 लाख पुरुष यांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. 2019-2021 या दरम्यान, हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी आता प्रकाशित करण्यात आल्या असून त्यात ही माहिती समोर आलीय. जवळपास 11 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात महिलांचे सेक्स पार्टनर हे पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

कोण कोण ती राज्य?

पुरुषांपेक्षा महिलांचे सेक्स पार्टनर अधिक असलेल्यांमध्ये राजस्थान, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, आसाम, केरळा, लक्षद्वीप, पुद्दूचेरी आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. राजस्थानचा नंबर समोर आलेल्या आकडेवारीमध्ये सगळ्यात पुढे आहेत. राजस्थानमध्ये महिलांच्या सेक्स पार्टनरची सरासरी ही 3.1 टक्के असून पुरुषांच्या सेक्स पार्टनरची सरसारी 1.8 टक्के असल्याचं दिसून आलंय.

सर्वेक्षणात शहरापेक्षा ग्रामीण भागातील महिलांनी, त्याचप्रमाणे लग्न न झालेल्या, घटस्पोटीत, विधवा किंवा नवऱ्यापासून वेगळ्या राहत अशलेल्या महिलांचे सेक्स पार्टनर अधिक असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या महिलांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त सेक्स पार्टनरसोबत संबंध 12 महिन्यांच्या आत ठेवत असल्याचं सर्वेक्षणात आढळंय.

हे सुद्धा वाचा

का करण्यात आला सर्वे?

धक्कादायक बाब म्हणजे पुरुषांनी आपल्या जोडीदाराव्यतिरीक्त संभोग केला असल्याचंही सर्वेक्षणातून दिसून आलंय. सर्वेक्षणात सहभागी केलेल्या 3.6 टक्के पुरुषांची 0.5 टक्के स्त्रियांच्या तुलनेत सर्वेक्षणाच्या 12 महिने आधी असं केल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलंय. शारिरिक संबंध ठेवताना केला निष्काळजीपणा, कॉन्डमचा होणारा कमी वापर आणि या सगळ्यामुळे वाढणारा एचआयव्ही एड्स यांचा धोका, या मुलभूत बाबींचा अभ्यास करण्यासाठी सदर सर्वेक्षण करण्यात आलं होतं.