नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली लस झाली उपलब्ध, पाहा किंमत

| Updated on: Jan 26, 2023 | 4:58 PM

भारत सरकारने 23 डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती. सर्वप्रथम, नाकाची लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे बुकिंग फक्त Cowin पोर्टलवरून केले जाणार आहे.

नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली लस झाली उपलब्ध, पाहा किंमत
नाकाद्बारे देण्यात येणारी भारत बायोटेकची लस
Follow us on

नवी दिल्ली  : नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली नेझल लस ‘इनकोव्हॅक'(Nasal Covid Vaccine) आजपासून उपलब्ध झाली. भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही नेझल व्हॅक्सिन (Nasal Vaccine) ‘इनकोव्हॅक’ (iNCOVACC) लाँच केली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केले आहे. नाकातून देण्यात येणारी ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे.

भारत सरकारने 23 डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती. सर्वप्रथम, नाकाची लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे बुकिंग फक्त Cowin पोर्टलवरून केले जाणार आहे.

बुस्टर म्हणून मिळणार
सध्या इंजेक्शनद्वारे लसीकरण केले जात आहे. या लसीला इंट्रामस्क्युलर लस म्हणतात. नाकाची लस ही नाकातून दिली जाते. तिला इंट्रानासल लस म्हणतात. म्हणजेच, ते इंजेक्शनने देण्याची गरज नाही किंवा तोंडावाटे लसीप्रमाणे दिली जात नाही. हे स्प्रेसारखे आहे. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड सारख्या लस घेणाऱ्यांना इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.

हे सुद्धा वाचा

4 थेंबही पुरेसे
नेझल लस पहिली लस म्हणून देखील वापरली जाऊ शकते. भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी सांगितले की, पोलिओप्रमाणेच या लसीचे 4 थेंबही पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन थेंब टाकावेत.

या नाकातील लसीला iNCOVACC असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी याचे नाव BBV154 असे होते. त्याची खास गोष्ट अशी आहे की ते शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते. ही लस इंजेक्शनने दिली जात नसल्यामुळे संसर्गाचा धोका नाही. ही लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही.