International Kissing Day 2022:…म्हणून किसिंग डे केला जातो साजरा, चुंबन घेणं शरीरासाठी आणि मनासाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या…

| Updated on: Jul 06, 2022 | 6:13 AM

तुमच्यातील नात्यात अधिक प्रेम, आपुलकी निर्माण करायची असेल, एकाच धाग्यात गुंफून ठेवायचे असेल तर किसिंग डे हा तुमच्यासाठी स्पेशलच असतो. ज्यावेळी तुम्ही एकाद्याला किस करता, त्यावेळी ऑक्सिटोसिन सोडल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना निर्माण होते.

International Kissing Day 2022:...म्हणून किसिंग डे केला जातो साजरा, चुंबन घेणं शरीरासाठी आणि मनासाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या...
आंतरराष्ट्रीय किसिंग डे
Follow us on

मुंबईः जगभरात दरवर्षी 6 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय किसिंग डे (International Kissing Day) अर्थातच चुंबन दिवस म्हणून साजरा केला जातो. तरुणवर्गात हा दिवस अगदी खास मानला जातो. खरं तर हा दिवस युवावर्गाला पुन्हा एकदा व्हॅलेनटाईन दिवसाची आठवण करून देतो, त्या दिवसात पुन्हा एकदा ते त्या दिवसात रमतात. मात्र कोणत्याही मनुष्याची नातेसंबंधाची जोपर्यंत गोष्ट येते, त्या नात्याप्रमाणे चुंबन याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. मात्र व्हॅलेन्टाईन डेमधील (Valentine’s Day) किस डे आणि आज असणारा किस डे यामध्ये फरक आहे. पाश्चात्य देशात सार्वजनिक ठिकाणी किस करणे, चुंबन घेणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. परदेशात थँक्स आणि वेलकम म्हणण्यासाठी किस (Kiss) घेतात, त्यामुळे परदेशात ही गोष्ट खूप सर्वसामान्यपणे घेतली जाते.

यासाठी भारत मात्र अपवाद राहिला आहे. त्यामुळे हा किस डे का साजरा केला जातो, त्याचे महत्व का आहे आणि त्याचा इतिहास आणि पार्श्वभूमी काय आहे,त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

किस डे चा इतिहास

आंतरराष्ट्रीय किस डेची सुरूवात ही सर्वप्रथम युनायटेड किंगडममध्ये झाली होती. त्यानंतर 2000 सालानंतर मात्र चुंबन दिवसाला विशेष लोकप्रियता मिळू लागली आणि बघता बघता 6 जुलै हा दिवस सगळ्या जगात साजरा केला जाऊ लागला.

आंतरराष्ट्रीय किसिंग डे चे कारण

किसिंग डे अनेक देशात साजरा केला जातो, हा आंतरराष्ट्रीय किसिंग डे साजरा करताना दोन व्यक्तींच्या नात्यांमधील भावनांना अधिक गडद करण्यासाठी हा किसिंग डे साजरा केला जातो. दोघांच्या नात्यांमध्ये प्रेम आणि स्नेहाची भावना वाढवण्यासाठी, ती व्यक्त करण्यासाठी किस हा एक सुंदर मार्ग आहे. आज आंतरराष्ट्रीय किसिंग डे अर्थातच चुंबन दिवस असला तरी शारीरिक आकर्षणाचा आणि या किसिंग डेचा दुरदुरपर्यंतही याचा संबध येत नाही. चुंबन दिवस म्हणजे नात्यातील आपले ऋणानुंबध अधिक घट्ट करण्याचा दिवस आहे. याबाबत काही तज्ज्ञ किसिंग करणे म्हणजे दोन लोकांमधील अंतरिक भावना व्यक्त करणे, त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणे समजले जाते

असा साजरा केला जातो हा दिवस

आंतरराष्ट्रीय किसिंग डे हा खरंतर तुमच्या आयुष्यातील खास लोकांना किस करण्याचा स्पेशल दिवस आहे. हे कोणत्या जोडप्यांच्या प्रेमाच्या प्रतीकापुरते मर्यादित नाही, तर आई-वडील, भाऊ-बहीण, वडील-मुलगी, आई-मुलगा यांचे नातेही दाखवते. म्हणजेच, ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचं चुंबन घेण्याचा अधिकार या दिवशी तुम्हाला असतो. किस करणे म्हणजे तुम्ही तुमच्या नात्यातील गहेरपण अधिक गडद करण्यासारखे आहे.

चुंबन हे केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर ते उत्तम आरोग्याचेही लक्षण

किस केल्याने तुमच्या शरीरातील आनंदी हार्मोन वाढतो. चुंबन घेण्याची प्रक्रिया मेंदूतील रासायनिक प्रक्रियेला उत्तेजन देते, त्यामुळे ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन मेंदूत निर्माण होते. त्यामुळे मेंदुतील आनंद राहण्याच्या प्रक्रियेला उत्तेजन मिळते, आणि शरीराला त्याचा फायदा होता. चुंबन घेतल्यामुळे तुमच्या कोर्टिसोल म्हणजेच तुमच्यातील असलेल्या तणावाची पातळीही कमी होते.

नात्यातील आपुलकी दृढ करतो किसिंग डे

तुमच्यातील नात्यात अधिक प्रेम, आपुलकी निर्माण करायची असेल, एकाच धाग्यात गुंफून ठेवायचे असेल तर किसिंग डे हा तुमच्यासाठी स्पेशलच असतो. ज्यावेळी तुम्ही एकाद्याला किस करता, त्यावेळी ऑक्सिटोसिन सोडल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना निर्माण होते. किस करणे म्हणजे तुमच्या नात्यामध्ये आनंद आणि समाधान व्यक्त करण्यासारखे आहे. त्यामुळे नातेसंबंधात महत्वाची भूमिका ही चुंबनाचीही असते.

तज्ज्ञांची मतं आणि सल्ला

आज किसिंग डे असल्याने मानसोपचार तज्ज्ञ, इतर डॉक्टरांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. तज्ज्ञ सांगतात की, एक मिनिट किस केल्याने शरीरातील जवळपास 6 कॅलरिज नष्ट होतात.

आसक्तीची भावना

ज्यावेळी एखादे जोडपे चुंबन घेते तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये लव्ह हार्मोन नावाचा ऑक्सिटोसिन हार्मोन तयार होता. या हार्मोनमुळे एकमेकांच्या नात्यातील आपुलकी आणि आसक्तीची भावना निर्माण होते.

तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग

आनंदी संप्रेरक वाढवण्याव्यतिरिक्त, चुंबन तुमची कोर्टिसोल पातळी वाढवते आणि अशा प्रकारे तुमची नैतिक मूल्ये सुधारते. किस केल्याने कॉर्टिसोलची पातळी आणि तणाव कमी होतो. चुंबन घेणे आणि इतर प्रेमाने मिठी मारणे किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणणे आपल्याला असलेल्या तणावावर त्याचा परिणाम होता,तसेच शारीरिक प्रक्रियांवरही परिणाम होतो.