PHOTO | बुलडाण्यात सवर्णा फाट्यावर विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

शेगाव-खामगाव रोडवरील सवर्णा फाट्यावर मारुती ओमनी या गाडीचा विचित्र अपघात घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 11, 2022 | 5:49 PM
1 / 5
शेगाव-खामगाव रोडवरील सवर्णा फाट्यावर मारुती ओमनी या गाडीचा विचित्र अपघात घडला आहे. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

शेगाव-खामगाव रोडवरील सवर्णा फाट्यावर मारुती ओमनी या गाडीचा विचित्र अपघात घडला आहे. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

2 / 5

शेगावकडून खामगावकडे एक आयशर वाहन भरधाव जात होते. यावेळी सवर्णा फाट्याजवळ हे वाहन आले असताना वाहनाचा मध्यभागी असलेला पाईप उखडून उजव्या बाजूने निसटून हवेत उडाला.

3 / 5

नेमके त्याचवेळी विरूध्द दिशेने म्हणजे शेगावकडे धावत असलेल्या मारूती ओमनी व्हॅनमध्ये तो पाईप काचेतून कंडक्टर सिटला भेदून आरपार घुसला.

4 / 5

सुदैवाने कंडक्टर साईडने कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

5 / 5

मारुती ओमनीमध्ये मागच्या बाजूने एक व्यक्ती बसलेला होता. मात्र तो सुध्दा ड्रायव्हरच्या दिशेने असल्याने सुदैवाने वाचला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us