
लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभु ही तिचा एक्स पती नागा चैतन्य याच्या साखरपुड्यानंतर चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आता अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

समंथा रुथ प्रभु हिचे फोटो पाहून लोकांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. नागा चैतन्य याच्या साखरपुड्यानंतर समंथाला काय झाले असेच चाहते विचारत आहेत.

नुकताच समंथा रुथ प्रभु ही एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी ती ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. मात्र, समंथा रुथ प्रभुला पाहून चाहते चिंतेत आले.

समंथा रुथ प्रभु हिच्या फोटोवर कमेंट करत एका म्हटले की, हिच्या चेहऱ्याचा चमक गेली. दुसऱ्या लिहिले की, अरे बापरे हे काय झाले समंथाला?

तिसऱ्याने लिहिले की, समंथा रुथ प्रभु हिचे वजन खूप जास्त कमी झाले, चेहरा पण ओळखू येत नाहीये. अजून एकाने लिहिले की, ती आनंदात नाहीये.