
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुंत्रसंचलनाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.

आता प्राजक्तानं सुंदर ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.