खासदार नवनीत राणांकडून धूर फवारणी, रोगराई हटवण्यासाठी मैदानात

| Updated on: Aug 01, 2019 | 9:57 AM

अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा (MP Navneet Rana) थेट धूर फवारणी करताना पाहायला मिळाल्या.

1 / 6
अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा (MP Navneet Rana) थेट धूर फवारणी करताना पाहायला मिळाल्या. नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेचे कर्मचारी काही पावलं उचलत नसल्यामुळे, नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी स्वत: धूर फवारणी केली.

2 / 6
पावसामुळे गटारी-नाले तुंबले आहेत, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. त्याचाच भाग म्हणून डास पळवून लावण्यासाठी नवनीत राणांनी स्वत: धूर फवारणी यंत्र हातात घेतले.

3 / 6
अमरावतीतील महावीर नगर, राजापेठ या भागात नवनीत राणांनी स्वत: औषध फवारणी केली. तर त्यांचे पती रवी राणा यांनी गांधी आश्रम, महाजन पुरा, गडगडेश्वर मंदीर यासारख्या झोपडपट्टी भागात औषधांची फवारणी केली.

4 / 6
आपल्या मतदारसंघातील खासदार आणि आमदार अशाप्रकारे औषध फवारणी करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

5 / 6
नवनीत राणा या खासदार झाल्यापासून त्या आपल्या मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली होती.

6 / 6
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांची मनं जिंकण्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतात तिफन चालवली होती.