Jawaharlal Nehru Death Anniversary : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी पडद्यावर लीलया साकारले पंडित जवाहरलाल नेहरू!

| Updated on: May 27, 2021 | 11:35 AM

पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आज (27 मे) त्यांची पुण्यतिथी देशभरात साजरी केली जात आहे. स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरूंनी 3359 दिवस तुरुंगात घालवले. त्यांना तब्बल 9 वेळा तुरुंगात पाठवण्यात आले होते.

1 / 7
पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आज (27 मे) त्यांची पुण्यतिथी देशभरात साजरी केली जात आहे. स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरूंनी 3359 दिवस तुरुंगात घालवले. त्यांना तब्बल 9 वेळा तुरुंगात पाठवण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने 27 मे 1964 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या वेळी ते 74 वर्षांचे होते. बॉलिवूडमध्येही त्यांच्यावर अनेक चित्रपट आणि मालिका बनल्या. या चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये बर्‍याच कलाकारांनी ‘नेहरू’ यांची भूमिका साकारली आहे.

2 / 7
‘गांधी’ (1982) या चित्रपटात जवाहरलाल नेहरूंची भूमिका अभिनेता रोशन सेठ यांनी केली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते. रोशन सेठ यांच्या या भूमिकेसाठी, त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी बाफ्टा पुरस्कारात नामांकन देण्यात आले होते. रोशन सेठ हे एक ब्रिटिश अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक होते.

3 / 7
'नेहरू' या चित्रपटात जवाहरलाल नेहरूंची व्यक्तिरेखा अभिनेते प्रताप शर्मा यांनी साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण कुमार यांनी केले होते. त्यावेळी हा चित्रपट खूपच गाजला होता. अभिनेते प्रताप शर्मा यांचे 2011 मध्ये निधन झाले.

4 / 7
अभिनेते दलीप ताहिल यांनी प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांच्या बायोपिकमध्ये जवाहरलाल नेहरूंची भूमिका साकारली होती. फरहान अख्तरचा 'भाग मिलखा भाग' हा सिनेमा 2013मध्ये प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले होते.

5 / 7
1993 साली ‘सरदार’ या चित्रपटात अभिनेते बेंजामिन गिलानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका केली होती. या चित्रपटाद्वारे त्यांना खूप प्रेम मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता यांनी केले होते.

6 / 7
डेन्झिल स्मिथ यांनी ‘शोभायात्रा’ (2004) चित्रपटात पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका केली होती. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘शोभायात्रा’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाफत खान यांनी केले होते.

7 / 7
अजय देवगणच्या 'लीजेंड ऑफ भगतसिंग' (2002) या सुपरहिट चित्रपटात सौरभ दुबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं. त्याचबरोबर हा चित्रपट बर्‍याचदा टीव्हीवरही दाखवला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते.