Salon Reopen | महाराष्ट्रात पुन्हा सलून सुरु, नियम पाळून केशकर्तन

| Updated on: Jun 28, 2020 | 11:00 AM

महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

1 / 5
राज्य सरकारच्या निर्णयानंतर आजपासून (रविवार, 28 जून) महाराष्ट्रातील सलून सशर्त सुरु झाली आहेत. तीन महिने केश कर्तनालये बंद राहिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या. (फोटो : एएनआय)

2 / 5
कंटेनमेंट झोनबाहेरची केश कर्तनालये सुरु झाली आहेत. यावेळी केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडींग अशा सेवा देता येतील. मात्र दाढी, मसाज, फेशियल किंवा त्वचेशी निगडित सेवा देण्यास तूर्तास मनाई आहे. (फोटो : एएनआय)

3 / 5
सलून कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अ‍ॅप्रन आणि मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. दुकानात खुर्च्या, रिकाम्या जागा, फरशीसह इतर जागा दर 2 तासांनी निर्जंतुक करणं आवश्यक आहे.  फिजिकल डिस्टन्सदेखील आवश्यक आहे. (फोटो : एएनआय)

4 / 5
 ग्राहकांसाठी केवळ एकदाच वापरात येणारे डिस्पोजल टॉवेल, नॅपकिन बंधनकारक करण्यात आले आहेत. ग्राहकांसाठी मास्क वापरणं बंधनकारक आहे. (फोटो : एएनआय)

5 / 5
महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, प्रत्येक सलून व्यवसायिकास 1 लाख रुपये रोख आर्थिक मदत आणि आत्महत्या केलेल्या व्यवसायिकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची त्वरित आर्थिक मदतीची मागणी असोसिएशनने केली आहे. (फोटो : एएनआय)