PHOTO | बिहार विधानसभा निवडणुकीत तेजप्रताप यादव यांचा अनोखा प्रचार, कधी वाजवली बासूरी, तर कधी ट्रॅक्टरवर स्वार!

| Updated on: Nov 01, 2020 | 3:53 PM

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला होणार आहे. बिहारचं मैदान मारण्यासाठी कांग्रेस-RJD आणि भाजप-JDU, सोबतच लोक जनशक्ती पार्टीने कंबर कसली आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उठवून दिली आहे.

1 / 6
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही मुलं जोरदार प्रचार करत आहेत. त्यात लालू यांचा मोठे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. यंदाच्या निवडणुकीतही ते आपल्या खास अंदाजातील प्रचारामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

2 / 6
समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदार संघातून तेजप्रताप यादव निवडणूक लढवत आहेत. तेजप्रताप यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

3 / 6
तेजप्रताप यादव यांनी आपल्या खास शैलीत जोरदार प्रचार आरंभला आहे. कधी ते सायकलवरुनही मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

4 / 6
निवडणुकीच्या प्रचारासाठी एका गावात गेल्यावर बाजूच्याच शेतात काम सुरु असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यावेळी थेट शेतात उतरुन त्यांनी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग आपल्या हाती घेतलं.

5 / 6
इतकच नाही तर तेजप्रताप यांनी एका गावात बासुरी वाजवत स्थानिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

6 / 6
2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत तेजप्रताप यांनी वैशाली जिल्ह्यातील महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेजप्रताप यांनी निवडणुक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार फक्त बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केली आहे.