PHOTO | येत्या शनिवारी ‘ब्ल्यू मून’चं दर्शन; नंतर 19 वर्षे वाट पाहावी लागणार

| Updated on: Oct 29, 2020 | 5:33 PM

31 ऑक्टोबर म्हणजेच हॅलोव्हिनच्या रात्री आकाशात पहिल्यांदा 'ब्ल्यू मून' दिसणार आहे.

1 / 9
31 ऑक्टोबर म्हणजेच हॅलोव्हिनच्या रात्री आकाशात पहिल्यांदा 'ब्ल्यू मून' दिसणार आहे. या खास क्षणाचे आपण सर्व साक्षी असणार आहोत. कोरोनाच्या संकटाने 2020 पूर्ण जगाला अत्यंत वाईट वेळ दाखवली. पण, 31 ऑक्टोबरला होणाऱ्या खगोलीय घटना सर्वांनाच एक सुखद अनुभव देईल.

2 / 9
ब्ल्यू  मून एक असामान्य घटना आहे. हा ब्ल्यू मून दर दोन ते तीन वर्षांनंतर दिसतो. पण, 2020 मध्ये दिसल्यानंतर हा निळा चंद्र पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला 2039 पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. ‘ब्ल्यू मून’ म्हणजेच निळा चंद्र’ ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असून खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

3 / 9
नासाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतेकवेळा 'ब्ल्यू मून' पिवळा आणि पांढरा दिसतो. पण, यंदाचा चंद्र हा वेगळा असणार आहे. असा चंद्र तुम्ही आजपर्यंत कधीही बघितला नसेल.

4 / 9
नासानुसार, कधी कधी निळा चंद्र दिसणे सामान्य आहे. पण, यामागील कारण वेगळं असतं. वातावरणातील परिस्थितींमध्ये बदल झाल्याने या चंद्राचा रंग निळा दिसतो.

5 / 9
'ब्ल्यू मून'चा अर्थ निळा चंद्र असा नसून एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला 'ब्लू मून' म्हणतात. या प्रकारच्या खगोलीय घटना अनेक वर्षांमध्ये एकदा होत असते.

6 / 9
मासिक कॅलेंडरनुसार जेव्हा 1 आणि 31 ऑक्टोबर 2020 रोजी पौर्णिमा असेल तेव्हा पूर्ण चंद्र दिसेल. ऑक्टोबरच्या महिन्यात दोन पौर्णिमा निश्चित येतात. मात्र यामध्ये दुसऱ्या पौर्णिमेला म्हणजेच 31 ऑक्टोबरला पूर्ण चंद्र हा 'ब्ल्यू मून'च्या रुपात दिसेल.

7 / 9
31 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी जर आकाश स्वच्छ असेल तर दुर्बिणीच्या सहाय्याने कोणीही 'ब्ल्यू मून' पाहू शकेल, असा दावा खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.

8 / 9
या खगोलीय घटनेला पाहाण्यासाठी नेहरु तारामंडळसह अनेक खगोलशास्त्रज्ञ प्रतिक्षा करत आहेत.

9 / 9
चंद्रचा महिन्याचा कालावधी हा 29.531 दिवसांचा असतो. म्हणजेच 29 दिवस, 12 तास, 44 मिनिटे आणि 38 सेकंद. म्हणून एका महिन्यात दोनवेळा पौर्णिमा येण्यासाठी त्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला पौर्णिमा यायला हवी. हेच 31 ऑक्टोबरला होत आहे.