मुसळधार पावसानं वाहून गेला पूल, पावसाचं रौद्र रुप दाखवणारे भीषण PHOTOS

| Updated on: Oct 16, 2020 | 12:12 PM

पुरामुळे रात्रीपासून सोलापूर-विजापूर हायवेवरील वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे.

1 / 8
दोन दिवसांच्या पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी नदी, नाले भरून वाहिल्याने गावांत पाणी शिरलं आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे.

2 / 8
सोलापूरमध्येही पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. वैराग हिंगणी रस्त्यावरील पूल पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

3 / 8
हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने वैराग रस्त्यावर पाणी आलं. या पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की यामध्ये पूलही वाहून गेला आहे.

4 / 8
पावसानं असं नुकसान केल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हिंगणी -वैराग रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

5 / 8
तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे संपूर्ण पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

6 / 8
पुरामुळे रात्रीपासून सोलापूर-विजापूर हायवेवरील वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे.

पुरामुळे रात्रीपासून सोलापूर-विजापूर हायवेवरील वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे.

7 / 8
गुरुवारी रात्री हत्तुर इथं रस्त्यावर पाणी आल्याने सोलापूर-विजापूर हा नॅशनल हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या रस्त्यावरील वाहतूक मागील 14 तासंपासून खोळंबली आहे.

8 / 8
सोलापूर-विजापूर जाणाऱ्या नागरिकांना सोलापूर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की पाणी ओसरेपर्यंत कोणीही या हायवेवर प्रवास करू नये.