PHOTO | पालकमंत्री असा असावा, टोलनाक्यावरील कोंडीला वैतागलेल्या भुजबळांनी ताफा थांबवून वाहने सोडली

| Updated on: Dec 25, 2020 | 4:29 PM

कॅबिनेट मिनिस्टर आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांची सुटका केली.

1 / 5
नाताळ, शनिवार आणि रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी सहलीचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. नाशिकमधील टोलनाक्यावर अशाच प्रकारची वाहनांची कोंडी झाली. या कोंडीचा फटका  अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बसला.

2 / 5
मुंबईहून निघालेल्या भुजबळांचा ताफाही या टोलनाक्यावरील कोंडीत सापडला.  मात्र त्यांनी याबाबत तक्रार व्यक्त न करता एक जबाबदार लोकप्रतिनिधीची जबाबदारी पार पाडली.

3 / 5
छगन भुजबळ यांनी आपला ताफा थांबवून टोल नाक्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत केली.

4 / 5
नववर्षानिमित्ताने अनेक जण नाशिकच्या दिशेने जात आहेत. यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील टोल नाक्यावर प्रचंड प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या.  यावेळेस मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळही नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्यांनाही या वाहनांच्या रांगाचा त्रास सहन करावा लागला.

5 / 5
मात्र  भुजबळ यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. वाहनांच्या रांगेत अडकलेल्या नागरिकांना भुजबळ यांनी दिलासा दिला. भुजबळांनी  ही कोंडी मुक्त करण्यासाठी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना मदत केली. तसेच अशा परिस्थितीत काय करावे, याबाबत  मार्गदर्शनही केलं. दरम्यान भुजबळ यांनी केलेल्या या कार्यामुळे वाहन चालकांची लवकरात लवकर या कोंडीतून सुटका झाली.